मुक्तपीठ टीम
भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे इयत्ता ६वी ते १२वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. चित्रकला स्पर्धेची थीम ही न्यू इंडियाद्वारे डिजिटल इंडियाचे व्हिज्युअलायझेशन आहे. या स्पर्धेच्या आयोजनामागील हेतू म्हणजे डिजिटल इंडियाच्या कल्पनेवर भर देण्याचा आहे.
देशातील तरुणांच्या कल्पनांना उंच भरारी देण्यासाठी आणि डिजिटल इंडियाचे त्यांचे स्वप्न साकारात प्रोत्साहित करण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. या चित्रकला स्पर्धेत एक डिजिटल भारत जो मुलांनी अनुभवला आहे तो चित्रस्वरूपात साकारायचा आहे.
देशभरातील शाळकरी मुलांचा ‘या’ स्पर्धेत मोठा सहभाग!
- माय गव्हरमेंट, एमईटीद्वारे आयोजित या चित्रकला स्पर्धेत भाग घेऊन संपूर्ण भारतातील शालेय विद्यार्थ्यांना त्यांची कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.
- इयत्ता ६वी ते १२वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होऊन त्यांची कला दाखवू शकतात.
- देशभरातील शाळकरी मुले मोठ्या प्रमाणात या स्पर्धेत सहभाग घेत आहेत.
- हे चित्र २५ डिसेंबरपर्यंत जमा करता येतील.
स्पर्धेत विजेते झालेल्या टॉप १२ विद्यार्थ्यांना मिळणार ‘हे’ बक्षीस!
डिजिटल इंडिया २०२३ कॅलेंडरचा भाग म्हणून टॉप १२ चित्र निवडले जातील. विजेत्यांना त्यांच्या योगदानासाठी प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस मिळेल.
चित्रकला स्पर्धेच्या नियम आणि अटी, जाणून घ्या
- स्पर्धा फक्त विद्यार्थ्यांसाठी आहे.
- चित्रकला स्पर्धेची थीम डिजिटल इंडियाचे व्हिज्युअलायझेशन आहे.
- स्पर्धकांनी तपशिलांमध्ये त्यांचा वर्ग, शाळेचे नाव आणि राज्य नमूद करणे आवश्यक आहे. बॉक्स किंवा चित्रावर त्याचा उल्लेख करा,
- सहभागी व्यक्तीला त्याची/ तिची एंट्री फक्त www.mygov.in वर jpg, jpeg किंवा pdf फॉरमॅटमध्ये सबमिट करावी लागेल. सहभागी व्यक्तीचे MyGov पोर्टलवर खाते असणे आवश्यक आहे.
- पेंटिंगमध्ये कोणतीही उत्तेजक, आक्षेपार्ह किंवा अनुचित सामग्री असू नये.
- पेंटिंग मूळ असावे आणि भारतीय कॉपीराइट कायदा, १९५७च्या कोणत्याही तरतुदीचे उल्लंघन करू नये.
- कोणत्याही मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्यास सहभागी अपात्र ठरेल.