Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मुळावर घाव घाला! –  विष्णु जैन

September 20, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Waqf Board Act

मुक्तपीठ टीम

तत्कालीन काँग्रेस सरकारने ‘वक्फ बोर्ड अधिनियम १९९५’द्वारे मुसलमानांना पाशवी अधिकार दिले आहेत. त्यामुळे मुसलमानच नव्हे, तर हिंदू, ख्रिश्चन आणि अन्य पंथीयांची कोणतही संपत्ती ही वक्फ बोर्डाची संपत्ती म्हणून घोषीत करण्याचा अधिकार मिळाला आहे. या कायद्याचा दुरुपयोग करून देशभरात बळपूर्वक भूमी बळकावून ‘लँड जिहाद’ केला जात आहे. परिणामी रेल्वे, संरक्षण दलानंतर देशभरात 8 लाख एकरपेक्षा जास्त भूमीची मालक ‘वक्फ बोर्ड’ झाली आहे. काँग्रेसने मुसलमानांना दिलेली शक्ती वा कायदेशीर अधिकार हा हिंदू, ख्रिश्चन वा अन्य कोणत्याही पंथाकडे नाही. या भेदभावपूर्ण कायद्याच्या विरोधात समस्त हिंदूंनी संघटित होऊन या कायद्याच्या मुळावरच घाव घातला पाहिजे आणि हा कायदा बदलण्यास केंद्र सरकारला भाग पाडले पाहिजे, असे आवाहन ‘वक्फ बोर्ड कायद्या’चे अभ्यासक तथा काशी येथील ज्ञानवापीच्या मुक्तीसाठी लढा देणारे सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांनी केले आहे.

तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली येथील तिरुचेथुरई हे पूर्ण गावच वक्फ बोर्डाचे संपत्ती घोषीत झाल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आहे. त्यावर हिंदु जनजागृती समितीने ‘वक्फ बोर्डाचा लँड जिहाद ?’ या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन चर्चासत्रात ते बोलत होते. अधिवक्ता विष्णु जैने पुढे म्हणाले की, या कायद्यामुळे गुजरातमधील हिंदूंचे द्वारका बेट, सुरत महानगरपालिका, प्रयागराज येथील चंद्रशेखर आझाद पार्क, ज्ञानवापी, मथुरा आदी अनेक जागा ही वक्फ बोर्डाची संपत्ती घोषीत करण्याचा सपाटा चालू आहे.

या वेळी ‘भारत व्हॉईस’च्या संस्थापिका गायत्री एन्. म्हणाल्या की, तामिळनाडूतील तिरुचेथुरई गावातील २००० वर्षांपूर्वीचे हिंदूंचे श्री चंद्रशेखर स्वामींचे मंदिर हे वक्फ बोर्डाची संपत्ती कशी काय होऊ शकते ? संसदेद्वारे लँड जिहादसाठी केलेल्या कायद्यामुळे हिंदूंचे घर, दुकान, शेती, भूमी आणि मंदिरही सुरक्षित नाही. हिंदूंना कोणतेही अधिकार नाहीत. हिंदूंची अवस्था बिकट करण्यात आली आहे. तर ‘विवेकांनद कार्य समिती’चे अध्यक्ष श्री. नीरज अत्री म्हणाले की, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह म्हणाले होते की भारतातील साधन–संपत्तीवर पहिला अधिकार मुसलमानांचा आहे. त्याचीच अंमलबजावणी या कायद्याद्वारे केली जात आहे. हिंदू दिवसेंदिवस या कायद्याच्या सापळ्यात खोलवर अडकत चालला आहे. हिंदू आताच संघटित झाला नाही, तर पुन्हा औरंगजेबाच्या काळात जाऊ.

या वेळी हिंदु जनजागृती समितीचे दिल्ली राज्याचे प्रवक्ते श्री. नरेंद्र सुर्वे म्हणाले की, हिंदूंची मोठी मंदिरे आणि संपत्ती सरकारने स्वत:कडे घेतली आहे, तर दुसरीकडे मुसलमानांच्या धार्मिक स्थळ वा संपत्ती यांना हात लावण्याऐवजी त्यांना संरक्षित करण्यासाठी हा कायदा केला आहे. हा हिंदूबरोबर केलेला छळकपट आहे. लँड जिहादसाठी अर्थात् भूमी हडपण्यासाठी कायद्याद्वारे एक संमांतर निर्माण करण्यात आली आहे. मुसलमानांना दिलेले हत्यार आहे. लँड जिहादसाठी प्रोत्साहन देणारा हा कायदा रद्द करण्यासाठी हिंदूंनी लढ दिला पाहिजे.


Tags: Govt NewsHindu LandmuktpeethVishnu JainWaqf Board Actघडलं-बिघडलंमुक्तपीठवक्फ बोर्ड कायद्याविष्णु जैनसरकारी बातमीहिंदू भूमी
Previous Post

हस्तकला कौशल्य विकासासाठी राज्यातील महिलांना मिळणार रुमा देवी यांचे मार्गदर्शन- मंत्री मंगलप्रभात लोढा

Next Post

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच!

Next Post
uddhav-eknath

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!