Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच!

शिवसेना, दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क नातं तोडण्याचा प्रयत्न यशस्वी होणार का?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
uddhav-eknath

मुक्तपीठ टीम

आवाज कुणाचा…शिवसेनेचा! अशा घोषणांनी दणाणून जाणारं मुंबईतील शिवाजी पार्क मैदान. काही वर्ष नाही, तर काही दशकं. एक नाही दोन नाही तर तब्बल सहा दशकं शिवसेना आणि शिवाजी पार्कच एक वेगळं नातं राहिलं आहे. दसरा मेळावा, शिवसेना आणि शिवाजी पार्क यांचं नातं समजून घेण्याचा हा प्रयत्न…

शिवसेना आणि शिवाजीपार्क…नातं ६ दशकांचं!

  • शिवाजी पार्क आणि शिवसेना यांचं नातं अतुट असं मानलं जातं.
  • शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेची स्थापना केली. त्यानंतर पहिला दसरा मेळावा शिवाजी पार्कातच झाला.
  • त्यानंतर शिवसेनेची दसरा मेळाव्याची परंपरा अखंडित राहिली आहे.
  • अपवाद होता तो पावसामुळे एक मेळावा टळल्याचा आणि दुसरे कोरोना संकटांचा.
  • वाजत-गाजत शिवाजी पार्कात जमायचं आणि दसरा मेळाव्यात विचारांचं सोनं लुटायचं अशी शिवसेनेची स्थापनेपासूनची परंपरा आहे.
  • या मेळाव्यात शिवसेनाप्रमुख आणि आता शिवसेनापक्षप्रमुख शिवसैनिकांपुढे पुढील दिशा दाखवणारे मार्गदर्शन करतात.
  • शिवसेनेची ही परंपरा खंडित करून शिवसेना आपलीच असे दाखवण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जातो आहे.
  • मात्र, काहीही झालं तरी शिवाजी पार्कातच दसरा मेळाव्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे.

आता नेमकं काय घडलं?

  • शिवाजी पार्कवरील सभेसाठी वर्षानुवर्षे फक्त शिवसेनाच दावेदार होती.
  • शिवसेनेतील जून २०२२च्या बंडखोरीनंतरही तेथे शिवसेनेचाच दावा होता.
  • यावर्षी २२ ऑगस्ट रोजी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथे आयोजनासाठी अर्ज करण्यात आला.
  • त्यानंतर आठवडाभराने ३० ऑगस्ट रोजी बंडखोर आमदार सदा सरवणकर यांनीही मुंबई मनपाकडे शिवाजी पार्कसाठी अर्ज केला.
  • त्यानंतर एकनाथ शिंदे गटानं एमएमआरडीएच्या बीकेसीमधील मैदानासाठी अर्ज केला.
  • एमएमआरडीएने तो अर्ज मंजूर केला.
  • शिवसेनेने शिवाजी पार्कच्या जोडीनेच बीकेसीमधील दुसऱ्या मैदानासाठी अर्ज केला, तो अर्ज मात्र फेटाळून लावण्यात आला.
  • आता शिवाजी पार्कची परवानगी सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवसेनेलाच मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
  • ती परवानगी मिळो न मिळो प्रसंगी शिवाजी पार्कात घुसून वाट्टेल त्या मार्गाने मेळावा घेण्याचा शिवसेनेचा निर्धार आहे.

शिंदे गट – भाजपा शिवसेनेला शिवाजी पार्क का नाकारतात?

  • पारंपरिक दसरा मेळाव्यात आणले जाणारे हे अडथळे शिवसैनिकांना चेतवून आक्रमक बनवणारे ठरण्याची शक्यता आहे.
  • तसेच शिवसेनेला मानणाऱ्या वर्गातही शिवसेनेविषयीची सहानुभूती अधिकच वाढवणारे ठरू शकतात.
  • तरीही शिंदे गट आणि भाजपाचे सरकार तसे करत आहे, त्याचं कारण शिवसेना म्हणजे दसरा मेळावा आणि दसरा मेळावा म्हणजे
  • शिवसेना हे मराठी माणसांच्या मनातील समीकरणच आहे! पण खरंच हे समीकरण अशा अडथळ्यांमुळे पुसले जाईल? तुम्हाला काय
  • वाटतं? युटयुबवर मुक्तपीठनं दिलेल्या पोलमध्ये भाग घ्या, आपलं मत व्हिडीओच्या रिप्लायमध्येही नोंदवा.

Tags: Chief Minister Eknath ShindeDussehra MelawamuktpeethShinde - Fadnavis Governmentshiv senashivaji parkUddhav Thackerayउद्धव ठाकरेघडलं-बिघडलंदसरा मेळावामुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिंदे-फडणवीस सरकारशिवसेनाशिवाजी पार्क
Previous Post

हिंदूंची भूमी बळकावणार्‍या ‘वक्फ बोर्ड कायद्या’च्या मुळावर घाव घाला! –  विष्णु जैन

Next Post

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच! अडथळ्यांचं काय?

Next Post
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच! अडथळ्यांचं काय?

शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कातच! अडथळ्यांचं काय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!