Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

क्रीडापटूंना पुरस्कार, राष्ट्रीय कल्याण आणि निवृत्तीवेतनासाठी सरकारची सुधारित योजना

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
Union Sports and Youth Affairs Minister Anurag Thakur

मु्क्तपीठ टीम

केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज नवी दिल्लीत खेळाडूंसाठी रोख पुरस्कार तसेच खेळाडूंसाठी राष्ट्रीय कल्याण आणि पेन्शन (एनएसडीएफ) सुधारित योजना सुरू केली. तसेच क्रीडा विभागाच्या योजनांसाठी dbtyas-sports.gov.in हे संकेतस्थळ आणि राष्ट्रीय क्रीडा विकास निधीचे संकेतस्थळ nsdf.yas.gov.in याची सुरुवात केली.

अनुराग ठाकूर यांनी माहिती दिली की, केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक विजेत्यांना तसेच त्यांच्या प्रशिक्षकांना रोख पुरस्कार देण्याच्या य़ोजना, क्रीडा विभागातर्फे राबवण्यात येणाऱ्या पंडित दीनदयाळ उपाध्याय राष्ट्रीय कल्याण आणि गुणवत्ता धारक खेळाडुंना निवृत्तीवेतन (पीडीयूएनडब्ल्यूएफएस) देण्याच्या योजनेत अनेक महत्वाचे बदल केले असून या योजना अधिक खेळाडूस्नेही, सहज उपलब्ध होण्यासारख्या आणि पारदर्शक बनवण्याचा दृष्टीकोन यामागे आहे.

केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की, हे पाऊल म्हणजे किमान सरकार, कमाल प्रशासन हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टीकोन पुढे घेऊन जाण्याच्या आणि सरकार आणि नागरिक, व्यवस्था आणि सुविधा तसेच प्रश्न आणि उपाय यांच्यातील तफावत भरून काढून नागरिकांना सक्षम करताना डिजिटल इंडियाच्या दिशेने आणखी एक पाऊल आहे. मंत्र्यांनी स्पष्ट केले की या सुधारित योजना क्रीडापटुंना विक्रमी वेळेत लाभ देण्यात अधिक पारदर्शकता आणि उत्तरदायित्व प्रदान करतील.

कोणताही वैयक्तिक खेळाडू त्याच्या किवा तिच्या क्षमतेनुसार, तिन्ही योजनांच्या लाभांसाठी थेट अर्ज करू शकेल, यावर ठाकूर यांनी प्रकाश टाकला. यापूर्वी प्रस्ताव क्रीडा महासंघ किंवा एसएआय (भारतीय क्रीडा प्राधिकरण) यांच्या माध्यमातून येत होते आणि प्रस्ताव सादरीकरणातही मोठा विलंब होत असे. काही वेळा तर एखादा प्रस्ताव मंजूर होण्यासाठी एक ते दोन वर्षाचा कालावधीही लागत असे. रोख पुरस्कारांसाठीचे प्रस्ताव योग्य वेळेत सादर होऊन त्यानंतरची मंजुरी वेळेवर मिळण्याची सुनिश्चिती करण्यासाठी, आता विशिष्ट क्रीडास्पर्धा संपण्याच्या तारखेपासून सहा महिन्यांच्या आत अर्जदाराने केवळ ऑनलाईन अर्ज करण्याची आवश्यकता आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्र्यांनी पुढे माहिती दिली की, प्रक्रियेचा कालावधी कमी करण्यासाठी सर्व तिन्ही योजनांसाठीचा पडताळणीची प्रक्रिया खूपच सोपी केली आहे. प्रशिक्षकांना त्यांचा रोख पुरस्कार वेळेत मिळावा, याची सुनिश्चिती करण्यासाठी, योजनेत आवश्यक ते बदल केले आहेत. डीफेलिंपिक्समधील क्रीडापटूंनाही आता निवृत्तीवेतन योजनेचे लाभ देण्यात येणार आहेत. या योजनांमध्ये वरील लाभ देण्याची अंमलबजावणी करण्यासाठी, क्रीडा विभागाच्या योजनांचे लाभ मिळवण्यासाठी क्रीडापटुंना वरील सुविधांसाठी अर्ज करता येईल.

क्रीडा विभागाने dbtyas-sports.gov.in हे संकेतस्थळ सुरू केले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी पुढे सांगितले की, क्रीडापटूंकडून आलेल्या अर्जांची पडताळणी हे ऑनलाईन संकेतस्थळ त्वरित करण्यासाठी सुविधाजनक आहे आणि प्रमाणीकरणासाठी वन टाईम पासवर्ड देऊन त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवला जाईल. आता खेळाडूंना मंत्रालयात प्रत्यक्ष येऊन अर्ज सादर करण्याची आवश्यकता नाही, असे ते म्हणाले. डीबीटी-एमआयएस याच्याशी संकेतस्थळ जोडले गेले असून भारत सरकारच्या डीबीटी म्हणजे थेट लाभ हस्तांतरणाचे मिशनचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीने क्रीडापटुंना त्यांच्या बँक खात्यांमध्ये निधी हस्तांतरित केला जाईल.

केंद्रीय मंत्र्यांनी पुढे असेही सांगितले की, विभागाला आलेल्या सर्व अर्जांवर कालबद्धरित्या निर्णय घेण्यातच संकेतस्थळ मदत करणार नाही तर क्रीडापटुंचे विविध प्रकारचे आवश्यक अहवाल आणि विदा व्यवस्थापन करण्यासाठीही त्याचा उपयोग केला जाईल. वेळोवेळी क्रीडापटुंच्या आवश्यकतांनुसार आणि प्रचलित परिस्थिती पाहून ऑनलाईन संकेतस्थळात सुधारणा केली जाईल.

केंद्रीय मंत्री ठाकूर यांनी विभागाने समर्पित परस्परसंवादात्मक संकेतस्थळ nsdf.yas.gov.in (नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड) हेही सुरू केले असल्यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारे, सार्वजनिक उपक्रम, खासगी कंपन्या आणि व्यक्ती यांच्याकडून सीएसआर अंतर्गत देण्यात येत असलेल्या मदतीवर हा निधी आधारित असून देशातील क्रीडा क्षेत्राला चालना आणि विकास करण्यासाठी तो आहे.

केंद्रीय मंत्र्यांनी माहिती दिली की, व्यक्ती, संस्था आणि कॉर्पोरेट कंपन्या आता खेळाडू, क्रीडा केंद्रे आणि क्रीडा स्पर्धा यांना एनएसडीएफ निधीच्या मार्फत थेट योगदान देऊ शकतील. एनएसडीएफ निधी टार्गेट ऑलिंपिक पोडियम (टीओपी) योजना, प्रसिद्ध खेळाडूंकडून तसेच क्रीडासंघटनांकडून पायाभूत सुविधांचा विकासाकरता वापरला जाईल. हे समर्पित संकेतस्थळ केवळ क्रीडापटुच नव्हे तर सीएसआरमधून मदत देऊ इच्छिणाऱ्यांनाही सहज आणि पारदर्शक पद्धतीने उपलब्ध होईल. एनएसडीएफ देशातील क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अत्यंत यशस्वी होण्यासाठी हे संकेतस्थळ मदत करेल, असे ठाकूर यांनी सांगितले.


Tags: Athletes Awardgood newsmuktpeethNational Welfare and RetirementnsdfRevised SchemeUnion Sports and Youth Affairs Minister Anurag Thakuruseful newsउपयोगी बातमीकेंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूरक्रीडापटूंना पुरस्कारचांगली बातमीमुक्तपीठराष्ट्रीय कल्याण आणि निवृत्तीवेतनराष्ट्रीय क्रीडा विकास निधीसुधारित योजना
Previous Post

कथाकथनातून अध्ययनः ‘कथायात्रा’ उपक्रमात सहभागी विद्यार्थी मंत्रमुग्ध!

Next Post

दणकट, दिमाखदार ‘रॉयल एनफिल्ड’ लवकरच लाँच करणार इलेक्ट्रिक बाइक!

Next Post
Royal Enfield

दणकट, दिमाखदार 'रॉयल एनफिल्ड' लवकरच लाँच करणार इलेक्ट्रिक बाइक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!