मुक्तपीठ टीम
शेअर बाजारातील चढ-उतार, काहीशी मंदी याचा मोठ्या कंपन्यांनाही फटका बसत असतो. परंतु, अॅपल, गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि मेटा सारख्या तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या मात्र अशा मंदीला स्वतःला बळकट करण्याची संधी समजत आहे. त्यामुळे या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची मंदीतही चांदी होताना दिसत आहे.
कोणती टेक कंपनी काय करते आहे?
- मागील काही वर्षात, मायक्रोसॉफ्टने कर्मचार्यांचा बोनस दुप्पट केला आहे.
- गुगल इंजिनीअर्सना मोठ्याप्रमाणात करिअर संधी उपलब्ध करून देत आहे.
- अॅमेझॉन आपल्या डेटा सेंटर्सवर अधिक पैसे खर्च करताना, हाय-स्पीड इंटरनेटसाठी अंतराळात ३८ रॉकेट पाठवेल.
- अॅमेझॉनने आपल्या कॉर्पोरेट कर्मचार्यांचे मूळ वेतन १.२४ कोटींवरून २.७२ कोटी रुपये करण्याचे वचन दिले आहे.
- अॅपलने हार्डवेअर विभागाला दोन लाख डॉलर्स बोनस जाहीर केला आहे.
- फेसबुक पुढील खरेदीवर लक्ष केंद्रित करत आहे.
टेक तज्ज्ञांच्या मते, या दिग्गजांच्या योजना उर्वरित टेक सेक्टरमध्ये सुरू असलेल्या कपातीच्या अगदी विरुद्ध आहेत. मंदीच्या काळात, या कंपन्या आपला प्रचंड पैसा विस्तारासाठी वापरण्यात व्यस्त आहेत, जेणेकरून जेव्हा जग मंदीतून सावरेल तेव्हा त्यांना आपापल्या क्षेत्रातील वाढ मजबूत करता येईल. या मोठ्या कंपन्यांच्या या सकारात्मक धोरणांचं इतर टेक कंपन्याही अनुसरण करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांचीच चांदी होईल की नाही, ते स्पष्ट नसलं तरी मंदीतही नव्या संधी वाढतील.
पाहा व्हिडीओ: