Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘लेट्स रीड इंडिया फाऊंडेशन’ची आदरांजली, प्रा. एन. डी. पाटील यांच्या आयुष्यावर राज्यस्तरीय निबंध स्पर्धा

विजेत्यांना रोख रकमेसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र मिळविण्याची संधी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
lets read india essay competition

मुक्तपीठ टीम

आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक संघर्षशील आणि विवेकी नेतृत्व ठरलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि कार्य कर्तृत्वाचा सर्वसामन्यांना परिचय व्हावा या उद्देशाने त्यांच्या आयुष्यावरील राज्यस्तरीय निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन लेट्स रिड इंडियाकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना रोख रुपये १० हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र हे प्रथम पारितोषिक, रोख रुपये ५ हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे द्वितीय पारितोषिक, तर रोख रुपये ३ हजारसह सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र असे तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात येतील. तर काही उत्तेजनार्थ पारितोषिकेही प्रदान करण्यात येतील असे लेट्स रीड इंडीयाने कळवले आहे.

 

महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जडणघडणीत, तसेच विविध लोकचळवळी व लढ्यांमध्ये प्रा. एन. डी. पाटील यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. राज्यातील कष्टकरी व शेतकऱ्यांचा बुलंद आवाज बनलेले प्रा. एन. डी. पाटील अखेरपर्यंत राज्यातील सर्वसामान्य, कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढत राहिले. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले प्रा. एन. डी. पाटील महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री म्हणूनही उत्तम काम केले होते. नुकताच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहताना त्यांचे पुण्यस्मरण व्हावे यासाठी निबंध लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

 

सदर स्पर्धा हि सर्व वयोगटासाठी खुली असून कोणत्याही वयाच्या स्पर्धकाला यात सहभागी होता येईल, त्यासाठी कोणतीही वयाची अट ठेवण्यात आलेली नाही. तसेच निबंध लेखन स्पर्धेसाठी किमान शब्द मर्यादा १००० ते कमाल २५०० शब्द एवढी निश्चित करण्यात आली आहे.

 

स्पर्धेचे नियम व अटी

  • निबंधामध्ये शुद्धलेखनाच्या चुका नसाव्यात.
  • निबंध मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेमध्ये असावा.
  • निबंधाचे परिक्षण नामवंत अभ्यासक तसेच तज्ञपरिक्षकांमार्फत केले जाईल.
  • स्पर्धेतील निवडक निबंध पुस्तक रुपात छापले जातील.
  • परीक्षकांचा व आयोजकांचा निर्णय अंतिम असेल.
  • निबंधाचा मजकुर हा स्वरचित असावा. कॉपी केलेला किंवा कोणत्या लेखाचा काही भाग घेतल्याचे लक्षात आल्यास प्रवेशिका बाद केली जाईल.

 

भाग घेण्याची अंतिम तारीख

स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची अंतिम तारीख ५ फेब्रुवारी २०२२ असून स्पर्धकाने निबंधासोबत आपली संपूर्ण माहिती पाठवावी. तसेच स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्याही मार्गाने सहभागी होऊ शकता.

 

निबंध कसे पाठवणार ?

  • आपण आपले निबंध लिहून स्कॅन करून किंवा टाईप करून वर्ड किंवा पीडीएफ फाईल स्वरूपात तयार करून letsreadf@gmail.com या ई-मेल द्वारे पाठवावेत.
  • Google फॉर्म द्वारे तुम्ही स्पर्धेत सहभागी होऊ शकता.
  • लिंक – निबंध स्पर्धा : विषय : जेष्ठ नेते प्रा. एन डी पाटील
    https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLScd5I71FN2LoVgekKNnWMSUct6Hs2ZlKgUJwZ6ZMD9BlJLYnw/viewform
  • यासोबतच आपला निबंध लिहून पोस्टाने देखील पाठवू शकता.
  • पत्ता
    ३११, द ग्रेट ईस्टर्न गॅलरीया, प्लॉट नं. २०, सेक्टर ४, ऑफ पाम बीच रोड, नेरुळ पश्चिम, नवी मुंबई ४०० ७०६. फोन ०२२ २७७१०६४२.

Tags: Adaranjaligood newslets read india foundationmuktpeethN.D.PatilState Level Essay CompetitionTestimonialsआदरांजलीचांगली बातमीप्रशस्तिपत्रप्रा. एन. डी. पाटीलमुक्तपीठराज्यस्तरीय निबंध स्पर्धालेट्स रीड इंडीया फाऊंडेशन
Previous Post

मृत्यूपत्राविना वडिलांचा मृत्यू, लेकींना तरीही मिळणार मालमत्तेत वाटा!

Next Post

5G लाँच होण्यापूर्वीच जियोचा भविष्यवेध…’6Gजी’साठी ओलू विद्यापीठासोबत करार!

Next Post
jio 5G Internet

5G लाँच होण्यापूर्वीच जियोचा भविष्यवेध...'6Gजी'साठी ओलू विद्यापीठासोबत करार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!