मुक्तपीठ टीम
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्यांचं आव्हान राणांना चांगलंचं भारी पडलं आहे. खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबई न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र राणांना हनुमान चालीसाचे पठण करण्यास कोणीतरी प्रवृत्त केलं असा संशय राज्य सरकारचा आहे. त्यामुळे त्यांना डोकं देणारे ते हँडलर कोण, याचा शोध घेतला जाणार आहे. राज्य सरकारही या प्रकरणाची चौकशी सुरू करणार आहे.
राणांमागे हँडलर कोण ते शोधणार!
- राणांना मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्यास प्रवृत्त करणाऱ्या ‘घटकांचा’ शोध घेण्यासाठी महाराष्ट्र सरकार चौकशी सुरू करणार आहे.
- रविवारी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस या प्रकरणाचा तपास करून या दोघांच्या योजनेमागे कोणाचा हात आहे हे शोधून काढले जाईल.
राणांच्या कॉल डिटेल्सची तपासणी होणार!
- आम्ही खासदार आणि आमदारांच्या कॉल डिटेल्सची मागणी करू.
- त्यांच्या मागे कोणाचा तरी हात आहे त्याशिवाय ते असा धाडसी प्रयत्न करू शकत नाहीत…” पवार आणि पाटील या दोघांनीही राणांवर केलेल्या पोलीस कारवाईचे समर्थन केले आहे.
- उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘जेव्हा पोलीस सुरक्षेच्या कारणास्तव एखाद्या ठिकाणी जाण्यास नकार देतात तेव्हा आम्ही ते टाळतो. राणांनी सल्ल्याकडे लक्ष दिले नाही, आता कारवाई केली जाईल.