मुक्तपीठ टीम
गेल्या काही महिन्यांमध्ये सततच्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींमुळे महागाई वाढली आहे. परिणामी, सामान्यांना आपल्या आवश्यक खर्चांमध्ये कपात करावी लागत आहे. एसबीआय बँकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार, वाढत्या तेलाच्या किंमतींमुळे सामान्यांना इतर आवश्यक खर्चांमध्येही कपात करावी लागत आहे.
काय आहे सर्वेक्षणात?
- एसबीआयच्या कार्ड स्वाईप प्रणालीतून कुठे खर्च केला जात आहे, याची माहिती जमा केली गेली.
- यातून नागरिकांच्या खर्चाचा पॅटर्न समोर आला आहे.
- एसबीआयच्या सर्वेक्षणाचे मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. सौम्य कांती घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार, इंधन दरवाढीनंतर नागरिकांनी इतर आवश्यक खर्चांमध्ये कपात केली आहे.
- परिणामी, आवश्यक वस्तूंच्या मागणीवरही परिणाम झाला आहे.
- नागरिकांच्या खर्चाच्या ७५ टक्के भाग हा इंधनावर खर्च होत आहे.
- मार्च २०२१ च्या तुलनेत जून २०२१ मध्ये इंधनावरचा खर्च ६२ % वरुन ७५ % पर्यंत वाढला आहे.
- एप्रिल- मे २०२० मध्ये इतर खर्च ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता.
- कोरोना आणि लॉकडाऊनच्या दरम्यान इंधन दरवाढीचा फटका बसल्याने सामान्य नागरिक बेजार झाला आहे.
- सामान्यांचं महिन्याचं बजेट कोलमडलं आहे.
- अनेक कुटुंबियांनी घर खर्चासाठी बचती पैसे वापरायला सुरुवात केली आहे.
आर्थिक सुधाराची गती कमी होईल
- आर्थिक तज्ज्ञांनुसार, तेलाच्या वाढत्या किंमती या अर्थव्यवस्था सुधारणेच्या गतीला कमी करतील.
- तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे सामान्यांच्या बजेटवर परिणाम होत आहे.
- दुसरीकडे, उत्पन्न घटल्याने कुटुंबांची आर्थिक स्थिती नाजूक बनली आहे.
इंधनांवरचा कर कमी करण्याची गरज
- एसबीआयच्या अहवालातल्या सूचनेनुसार सामान्यांना दिलासा देण्यासाठी इंधनावरचा कर लवकरात लवकर कमी करण्याची गरज आहे.
- गेल्या वर्षभरात कच्च्या तेलाच्या किंमती या ७६ टक्क्यांवरुन ७५.३५ डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत.
- गेल्या काही आठवड्यांमध्ये देशातल्या अनेक शहरांमध्ये पेट्रोलने शंभरी पार केली आहे.