भारतीय स्टेट बँकेने आता कायम ठेवी म्हणजेच फिक्स्ड डिपॅाझिटवर (एफडी) मिळणाऱ्या व्याजात बदल केले आहेत. २ कोटींपेक्षा कमी फिक्स्ड डिपॅाझिटवर हे नवीन व्याजदर ८ जानेवारीपासून लागू झाले आहेत. आता १ पेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी फिक्स्ड डिपॅाझिटवर ०.१०% अधिक व्याज मिळेल. स्टेट बॅंकेने यापूर्वी १० सप्टेंबर २०२० रोजी फिक्स्ड डिपॅाझिटवरील व्याज बदलले होते.
या महिन्यात ८ जानेवारीला स्टेट बॅंकेने गृह कर्जाचे व्याजदर ०.३० टक्क्यांनी कमी केले आहेत. बँकेचे गृहकर्ज व्याजदर ६.८०% पर्यंत खाली आले आहेत.