Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आमदार’ आदित्य ठाकरेंचा ‘विकासाचा वरळी पॅटर्न’

वरळीत जे करून दाखवलं ते महाराष्ट्रात इतरत्रही करण्याची शक्यता

January 11, 2021
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
aditya thakare

अपेक्षा सकपाळ / मुक्तपीठ टीम

शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या वरळी मतदारसंघातून युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे निवडणुकीस सामोरे गेले तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण थेट निवडणूक लढवून लोकांमधून निवडून येणाऱ्या या पहिल्या ठाकरेंनी सुरु केलेला कामांचा धडाका आता चर्चेत आहे. राज्य मंत्रिमंडळात पर्यावरणमंत्री असणारे आमदार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातील विकासाचा वरळी पॅटर्न मतदारांच्या कौतुकाचा विषय आहे. आता राज्यात विकासाचा वरळी पॅटर्न इतरत्रही राबवण्याच्या तयारीत ते असल्याचं त्यांच्या ट्वीटवरून उघड होत आहे.

 

अॅनी बेझंट मार्गावरील पुनम चेंबर्सच्या येथे High visibility signals आणि चांगल्या फुटपाथना आम्ही नेहमीच प्राधान्य दिले आहे. आजही वरळीतील इतर काही भागात असे सिग्नल्स बसवण्यात आले. pic.twitter.com/VFCxDS3zLn

— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 9, 2021

सेनेतील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या वरळीत पारंपरिकता जपतानाच अत्याधुनिकतेकडे वळणारा विकास करण्यावर भर देण्यात येत आहे.

 
Aditya Thackeray worli patern-4

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुरक्षित – आकर्षक पदपथ, उड्डाणपुलाखालील उद्यान, समुद्रकिनारा परिसर सुशोभीकरणासह विविध विकासकामांचा वरळी आणि परिसरात काम जोरात सुरू आहे. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार ही कामे होत आहेत. यातील काही कामांचा आढावा आदित्य ठाकरे यांनी नुकताच घेतला.

 
Aditya Thackeray worli patern-5

वरळीत विभाग आणि परिसरात अनेक विकासकामे आंतरराष्ट्रीय दर्जाची तयार करण्यात येत आहेत. या कामातील सेनापती बापट मार्ग, दादर उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत तयार होणाऱ्या उद्यानाच्या कामाचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतला. तसेच प्रभादेवी येथील समुद्रकिनारा परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाची पाहणीदेखील आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच श्री गणेश विसर्जन जेट्टी, वरळी पोलीस कॅम्पपासून आरजी थडानी मार्गापर्यंत सर पोचकनवाला रोडवरील फुटपाथ तसेच पथदिव्यांच्या कामाचा आढावा आदित्य ठाकरे यांनी घेतला. नरिमन भट विसर्जन पॉइंटच्या प्रस्तावित सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करून त्यास एक सुंदर घाट बनविण्याच्या कामाला सुरुवात केली. निडर सामर्थ्याचे प्रतिक असलेला ‘झेबु बुल’ आता लोटस जंक्शनला थाटात उभा आहे. डीलाईल रोडवरील रोड ओव्हरब्रिजच्या कामाला आदित्य ठाकरे प्रत्येक महिन्याला भेट देत आहेत हे काम काटेकोरपणे वेळेत पूर्ण होईल आणि वाहतुकीची कोंडी लवकरच कमी होईल यासाठी रेल्वे आणि महानगर पालिका यांच्याशी समन्वय साधत आहोत.

 Aditya Thackeray worli patern-2

 

पर्यावरणमंत्री म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच आदित्य ठाकरे आमदार म्हणूनही आपलं कर्तव्य बजावतात, असंही एका महिला पदाधिकाऱ्याने सांगितलं. त्या म्हणाल्या, आदित्य ठाकरे स्वच्छ, सुंदर, सुरक्षित वरळी करण्यासाठी वेगाने काम करत आहेत. या विकासकामांतील वरळी नाका येथील आचार्य अत्रे चौकातील पदपथ सुशोभीकरण, नवीन वाहतूक पोलीस चौकी, निरीक्षण केंद्र निर्मिती आणि डॉ . अॅनी बेझंट रोड लोटस येथील सुशोभित उद्यान आणि नंदीच्या भव्य प्रतिकृतीचे लोकार्पण यावेळी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.

 
Aditya Thackeray worli patern-7

अॅनी बेझंट मार्गावरील पुनम चेंबर्समधील हाय व्हिजिब्लिटी सिग्नल बसविण्यात आले आहेत. यामुळे मुंबईची वाहतूक व्यवस्थाही अधिक सुरक्षित होणार आहे. पालिकेकडून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमाची संकल्पना शिवसेना नेते, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांची असून त्यांनी उपक्रम राबवल्याबद्दल पालिकेचे कौतुक केले आहे. महाराष्ट्रात नागपूर, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नाशिक व इतर शहरांमध्येही असे High visibility signals बसवण्याची विनंती गृहमंत्र्याकडे केली आहे.


Tags: Environment Minister Aditya Thackeraymla aditya thackeray's worli patern of developmentShivsenaworliworli paternworli patern of develpmentZebu Bullआमदार आदित्य ठाकरेंचा विकासाचा वरळी पॅटर्नवरळीवरळी पॅटर्नशिवसेना
Previous Post

पाण्यासाठी वडिल गाडीतून उतरले…झोपेत लहानगी मुलं पुढे गेली…माणुसकी पावली!

Next Post

#चांगलीबातमी आता स्टेट बॅंकेत ठेवींवर अधिक व्याज, ८ जानेवारीपासून नवीन व्याज दर लागू

Next Post
State Bank of India

#चांगलीबातमी आता स्टेट बॅंकेत ठेवींवर अधिक व्याज, ८ जानेवारीपासून नवीन व्याज दर लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!