Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी कर्मचाऱ्यांच्या संतापाची धग मुंबईत! रस्त्यावर रोखले! उच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
st strike mumbai

मुक्तपीठ टीम

गेल्या १२ दिवसांपासून राज्य सरकारमध्ये एसटी महामंडळाच्या विलिनीकरणासह एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कर्मचारी आंदोलन करत आहेत. आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब यांच्या ताठर भूमिकेमुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन अधिकच भडकत असताना भाजपाही त्याचा फायदा घेण्यासाठी पुढे सरसावली आहे. माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान दुसरीकडे या संपाविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. एस.टी. महामंडळानं संपकऱ्यांविरोधात अवमान याचिका सादर केली आहे. शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे उच्च न्यायालयाकडून निर्देश देण्यात आले आहेत. एसटीकडून ३४३ जणांविरोधात निलंबनाची नोटीस जारी करण्यात आली आहे.

 

भाजपा नेत्यांचा मंत्रालयासमोर मोर्चाचा प्रयत्न

  • एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यामागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.
  • माजी खासदार किरीट सोमय्या, आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली मंत्रालयासमोर मोर्चा काढण्याचा प्रयत्न करताना पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • त्याच पार्श्वभूमीवर मंत्रालयात परिसरात मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आलेली आहे मंत्रालयाची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.
  • मंत्रालय परिसरात जमा होणारे एसटी कर्मचारी कार्यकर्ते यांना आझाद मैदानात पोलीस घेऊन जात आहेत.
  • शिवाय कुठल्याही प्रकारे मंत्रालयासमोर आंदोलन होऊ नये आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मंत्रालयाबाहेर लावण्यात आला आहे.

शासकीय समिती एसटी सरकारीकरणाबद्दल अहवाल देणार!

  • कामगारांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी जी समिती नेमण्यात येणार आहे त्यात राज्याचे मुख्य सचिव, अर्थ आणि परिवहन खात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव यांचा समावेश असेल.
  • याशिवाय या समितीसमोर एस.टी. कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समाविशिष्ठ करण्याचा मुख्य मुद्दा असावा असं नमूद करत पुढील १२ आठवड्यांत या समितीनं आपला अहवाल सादर करावा असे निर्देश उच्च न्यायालयानं दिले आहेत.

 

संपकऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका, शुक्रवारी सुनावणी

  • एस.टी. महामंडळानं संपकऱ्यांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचिका सादर केली आहे.
  • उच्च न्यायालयाचा अवमान करत संप करणाऱ्यांना नोटीस जारी करण्याची महामंडळाकडनं उच्च न्यायालयाला विनंती करण्यात आली.
  • संप न करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश असूनही कामगार संपावर ठाम असल्याची माहिती महामंडळाकडनं उच्च न्यायालयाला देण्यात आली.
  • याची दखल घेत शुक्रवारपर्यंत कामगार संघटनांना अवमान याचिकेवर उत्तर सादर करण्याचे उच्च न्यायालयाकडून निर्देश देत पुढील सोमवारी नियमित न्यायालयापुढे सुनावणी होणार आहे.
  • मात्र कनिष्ठ वेतनश्रेणी कामगारांच्यावतीनं ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मात्र या अवमान याचिकेला विरोध करत ही याचिका दाखल होण्यायोग्य नाही असं उच्च न्यायालयाला सांगितलं.
  • एस.टी. महामंडळानं एकूण ३४३ जणांविरोधात अवमान केल्याबद्दल नोटीस जारी करण्याची मागणी केली आहे.
  • यात संपात सहभागी झालेल्या संघटनांचे नेते, पदाधिकारी तसेच इतर कामगारांना संपाच्या काळात कामावर न येण्यासाठी चिथावणी देणाऱ्यांचा प्रामुख्यानं समावेश आहे.
  • महामंडळानं मंगळवारी ३७६ कामगारांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Tags: Anil Parabgopichand padalkarKirit SomaiyaSadabhau Khotst employeesST Strikeअनिल परबएस.टी. महामंडळएसटी कर्मचारीकिरीट सोमय्यागोपीचंद पडळकरमुंबई उच्च न्यायालयसदाभाऊ खोत
Previous Post

रेल्वे मंत्र्यांचा नोकरशाहीला दणका, पूर्वतयारीशिवाय आढावा बैठकीत आलेले एक रजेवर, दुसरे व्हीआरएसवर!

Next Post

“हायड्रोजन बॉम्बची भाषा, लवंगीसुद्धा नाही”! आशिष शेलारांनी रियाझ भाटीचे आघाडीच्या नेत्यांसोबतचे फोटो दाखवले!!

Next Post
ashish shelar (2)

"हायड्रोजन बॉम्बची भाषा, लवंगीसुद्धा नाही"! आशिष शेलारांनी रियाझ भाटीचे आघाडीच्या नेत्यांसोबतचे फोटो दाखवले!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!