Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“संकटातही काहींना राजकारणाची खुमखुमी! बळ म्हणजे फक्त निवडणुका लढवणे नव्हे, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ!”

शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी साधला शिवसैनिकांशी संवाद

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Uddhav Thackeray Speech SS day 19-6-21

मुक्तपीठ टीम

शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांनी कोरोना, स्वबळाचा नारा, भाजपा आणि पश्चिम बंगाल निवडणुका या विषयांवर भाष्य केले. तसेच शिवसेनेच्या भवितव्यावरही ते बोलले. “अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. बळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे,”

 

शिवसेना पक्षप्रमुख,  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धठ ठाकरेंनी शिवसैनिकांशी  साधलेल्या ऑनलाईन संवादातील महत्वाचे मुद्दे:

 

 कोरोना संकटातही काहींना राजकारणाची खुमखुमी

  • कोरोना संकटाला एकजुटीने सामोरे जाण्याची गरज आहे.
  • मात्र, या संकटातही काही जणांना राजकारण करण्याची खूमखुमी आली आहे.
  • याला मी राजकारण नाही तर विकृती म्हणेन. राजकारणाचं विकृतीकरण करण्याचे काम ही मंडळी करत आहे.
  • ही विकृती कुठे तरी थांबली पाहिजे.
  • शिवसेनेसाठी सत्ता कधीच महत्त्वाची नव्हती आणि नसेल.
  • म्हणून तर वर्धापन दिनाला कोणतीही राजकीय घोषणा नाही तर प्रत्येक गाव करोनामुक्त करण्याचा संकल्प केला आहे.

काडकन आवाज काढेल तो शिवसैनिक, पण रक्तपात करणं हा गुणधर्म नाही!

  • शिवसेना प्रमुखांचं जुनं भाषण व्हायरल होतंय.
  • त्यातलं एक वाक्य ‘त्याचा फटकन आवाज आला, तर आपला काडकन आवाज आला पाहिजे’.
  • हीच शिवसेना आहे.
  • रक्तपात हा शिवसेनेचा गुणधर्म नाही तर अन्यायावर वार करणं हा शिवसेनेचा गुणधर्म आहे.
  • हे भाषण दोन दिवसापासून सगळीकडे का व्हायरल होत आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे.
  • याला म्हणतात शिवसैनिक. ही शिवसैनिकाची ओळख आहे.
  • असं असलं तरी फक्त हाणामाऱ्या करणं, खुनखराबा करणं हे आपलं काम नाही.
  • रक्तपात करणं हा शिवसैनिकाचा गुणधर्म नाही.
  • अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही.
  • पण ही ओळख जर कुणी मुद्दाम करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकांची ओळख अनेकांना आहे.

अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं!

  • अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत.
  • आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे.
  • बळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे.
  • मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला.
  • मराठी माणसाला स्वाभिमान दिला.
  • स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं.
  • आधी तलवार उचलण्याची ताकद तर कमव. मग वार कर. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे.
  • निवडणुका येतात जातात. जय पराजय होत असतो. कोण हारतं कोण जिंकतं.
  • पण हारल्यानंतर सुद्धा पराभूत मानसिकता घात करते.
  • पूर्वी खिडक्या बंद होत्या, शिवसेनेने मराठी माणसं तिथे घुसवली.
  • शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला त्याच्या मनगटातल्या ताकदीची जाणीव करून दिली.
  • तलवार पेलवण्याची ही जाणीव करून दिली तेंव्हा मराठी माणूस पेटून उठला.

 

बंगालनं बळ दाखवलं…त्याला म्हणतात स्बबळ!

  • स्वबळाचा अर्थ निवडणुका नुसतं जिंकणं नाही.
  • ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी लढल्या आणि जिंकल्या.
  • त्यासाठी मला बंगाली जनतेचं कौतुक करायचं आहे.
  • याला म्हणतात स्वबळ.
  • त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली.
  • निवडणूक काळात अनेक आरोप झाले, पण बंगाली माणसाने आपलं मत ठामपणे मांडलं.
  • बंगाली माणसाने प्रादेशिक अस्मितेचं उदाहरण दाखवून दिलं.

Tags: ShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेमुख्यमंत्री उद्धव ठाकरेशिवसेना
Previous Post

आज नवी मुंबईत शून्य नवे रुग्ण! सहा जिल्ह्यांचे टेन्शन कमी झालं तर महाराष्ट्र निम्म्यापेक्षा कमी!!

Next Post

ज्याला हॉकी स्टिकसाठीही मिळाला नकार, तोच ऑलिम्पिक संघात पुन्हा दिमाखात!

Next Post
hockey player surendra kumar

ज्याला हॉकी स्टिकसाठीही मिळाला नकार, तोच ऑलिम्पिक संघात पुन्हा दिमाखात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!