मुक्तपीठ टीम
शिवसेनेच्या ५५ वर्धापन दिनानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील तमाम शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यावेळी त्यांनी त्यांनी कोरोना, स्वबळाचा नारा, भाजपा आणि पश्चिम बंगाल निवडणुका या विषयांवर भाष्य केले. तसेच शिवसेनेच्या भवितव्यावरही ते बोलले. “अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. बळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे,”
शिवसेना पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धठ ठाकरेंनी शिवसैनिकांशी साधलेल्या ऑनलाईन संवादातील महत्वाचे मुद्दे:
कोरोना संकटातही काहींना राजकारणाची खुमखुमी
- कोरोना संकटाला एकजुटीने सामोरे जाण्याची गरज आहे.
- मात्र, या संकटातही काही जणांना राजकारण करण्याची खूमखुमी आली आहे.
- याला मी राजकारण नाही तर विकृती म्हणेन. राजकारणाचं विकृतीकरण करण्याचे काम ही मंडळी करत आहे.
- ही विकृती कुठे तरी थांबली पाहिजे.
- शिवसेनेसाठी सत्ता कधीच महत्त्वाची नव्हती आणि नसेल.
- म्हणून तर वर्धापन दिनाला कोणतीही राजकीय घोषणा नाही तर प्रत्येक गाव करोनामुक्त करण्याचा संकल्प केला आहे.
काडकन आवाज काढेल तो शिवसैनिक, पण रक्तपात करणं हा गुणधर्म नाही!
- शिवसेना प्रमुखांचं जुनं भाषण व्हायरल होतंय.
- त्यातलं एक वाक्य ‘त्याचा फटकन आवाज आला, तर आपला काडकन आवाज आला पाहिजे’.
- हीच शिवसेना आहे.
- रक्तपात हा शिवसेनेचा गुणधर्म नाही तर अन्यायावर वार करणं हा शिवसेनेचा गुणधर्म आहे.
- हे भाषण दोन दिवसापासून सगळीकडे का व्हायरल होत आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे.
- याला म्हणतात शिवसैनिक. ही शिवसैनिकाची ओळख आहे.
- असं असलं तरी फक्त हाणामाऱ्या करणं, खुनखराबा करणं हे आपलं काम नाही.
- रक्तपात करणं हा शिवसैनिकाचा गुणधर्म नाही.
- अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही.
- पण ही ओळख जर कुणी मुद्दाम करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकांची ओळख अनेकांना आहे.
अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं!
- अनेक राजकीय पक्ष कोरोनाच्या काळात स्वबळाचा नारा देत आहेत.
- आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे.
- बळ म्हणजे फक्त निवडणुका लढणे नाही तर अन्यायाविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे स्वबळ आहे.
- मुंबईत मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती, अपमानजनक जीवन होतं, मात्र बाळासाहेबांनी अंगार फुलवला.
- मराठी माणसाला स्वाभिमान दिला.
- स्वबळ म्हणजे केवळ निवडणुका लढणे नाही, तर अभिमानाचं, न्याय हक्क मागण्यासाठी स्वबळ हवं.
- आधी तलवार उचलण्याची ताकद तर कमव. मग वार कर. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे.
- निवडणुका येतात जातात. जय पराजय होत असतो. कोण हारतं कोण जिंकतं.
- पण हारल्यानंतर सुद्धा पराभूत मानसिकता घात करते.
- पूर्वी खिडक्या बंद होत्या, शिवसेनेने मराठी माणसं तिथे घुसवली.
- शिवसेनाप्रमुखांनी मराठी माणसाला त्याच्या मनगटातल्या ताकदीची जाणीव करून दिली.
- तलवार पेलवण्याची ही जाणीव करून दिली तेंव्हा मराठी माणूस पेटून उठला.
बंगालनं बळ दाखवलं…त्याला म्हणतात स्बबळ!
- स्वबळाचा अर्थ निवडणुका नुसतं जिंकणं नाही.
- ज्या पद्धतीने ममता बॅनर्जी लढल्या आणि जिंकल्या.
- त्यासाठी मला बंगाली जनतेचं कौतुक करायचं आहे.
- याला म्हणतात स्वबळ.
- त्यांनी बंगालची ताकद दाखवून दिली.
- निवडणूक काळात अनेक आरोप झाले, पण बंगाली माणसाने आपलं मत ठामपणे मांडलं.
- बंगाली माणसाने प्रादेशिक अस्मितेचं उदाहरण दाखवून दिलं.