मुक्तपीठ टीम
श्रीलंकेला मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. श्रीलंकेत सध्या मोठ्या प्रमाणावर आंदोलनं सुरू आहेत. हे आंदोलक थेट राष्ट्राध्यक्षांच्या घरातच घुसले होते. मात्र तोपर्यंत श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे हे देश सोडून मालदीवला पळून गेल्याचे वृ्त्त आहे. राजपक्षे यांनी शनिवारी संसदेच्या अध्यक्षांना १३ जुलै रोजी राजीनामा देणार असल्याची माहिती दिली होती. दरम्यान राजपक्षे यांचे धाकटे भाऊ आणि श्रीलंकेचे माजी अर्थमंत्री बासिल राजपक्षे यांनी देखील देशातून पलायन करण्याचा प्रयत्न केला पण बासिल यांना विमानतळावर कर्मचाऱ्यांनीच रोखले.
देशातून पळ काढण्याच्या प्रयत्नात होता राष्ट्रपींचा भाऊ!!
- बासिल राजपक्षे हे कोलंबो आतंरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते.
- ते दुबई किंवा अमेरिकेत पळून जाण्याच्या प्रयत्नात होते, असे सांगण्यात येत आहे.
- १२.१५ वाजता चेक इन काउंटरवर पोहोचले आणि पहाटे ३.१५ पर्यंत तिथेच होते.
- यावेळी विमानतळावर इमीग्रेशन कर्मचाऱ्यांनी काम करण्यास नकार दिला.
- विमानतळ कर्मचारी युनियनने बासिल राजपक्षे यांच्याविरोधात घोषणाबाजी केली इमिग्रेशन कर्मचीरा आणि युनियनने रात्रीच कामबंद आंदोलन केले.
- घोषणाबाजीनंतर बासिल यांना माघारी जावे लागलेय.
- ७१ वर्षीय बासिल यांनी यापूर्वीच अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
श्रीलंकेत आर्थिक संकट!!
- श्रीलंकेतील परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, रुग्णवाहिकेसाठी सुद्धा आता डिझेल-पेट्रोल उरले नाही. रुग्णवाहिका सेवेने जनतेला फोन न करण्याचे आवाहन केले आहे.
- आम्ही सेवा देण्यास असमर्थ असल्याचे त्यांनी सांगितले.
- लोकांना एक वेळचे जेवणही मिळत नाही.
- खाद्यपदार्थांच्या किमती अनेक पटींनी वाढल्या आहेत.
- डाळींचे भाव तीन पटीने वाढले आहेत.
- परिस्थिती इतकी गंभीर आहे की उपासमार, कुपोषण अशा परिस्थिती निर्माण झाल्या आहेत.
- श्रीलंकेत इंधनाच्या कमतरतेमुळे लोक पेट्रोल पंपावर रांगा लावतात.
- मोठ्या संख्येने लोक त्यांच्या कार आणि दुचाकी सोडून दैनंदिन प्रवासात सायकलवर आले आहेत.
- कार्यालये आणि महाविद्यालयांमध्ये स्थानिक लोक अनेकदा सायकल चालवताना दिसत आहेत.
हे ही वाचा: सोन्यासारख्या श्रीलंकेची राखरांगोळी: नेमकं काय भोवलं?