मुक्तपीठ टीम
दिल्ली पोलिसांनी सुरक्षा एजन्सींच्या मदतीने परराष्ट्र मंत्रालयात (MEA) काम करणाऱ्या एका ड्रायव्हरला अटक केली आहे. हा ड्रायव्हर पाकिस्तानला गोपनीय आणि संवेदनशील माहिती पुरवीत होता. दिल्ली पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांनी या प्रकरणात परराष्ट्र मंत्रालयात काम करणारे आणखी अधिकारी गुंतले आहेत का, याचा तपास सुरू केला आहे. ज्या ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे, त्याला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने हनी ट्रॅप केले होते.
पूनम शर्मा आणि पूजा नावाने ड्रायव्हर अडकला हनी ट्रॅपच्या जाळ्यात!!
- परराष्ट्र मंत्रालयाच्या आरोपी ड्रायव्हरला शुक्रवारी जवाहरलाल नेहरू भवन येथून अटक करण्यात आली आहे.
- आरोपी ड्रायव्हरला पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयने हनी ट्रॅप केले होते.
- पूनम शर्मा आणि पूजा असे नाव धारण केलेल्या पाकिस्तानी गुप्तहेराला हा आरोपी ड्रायव्हर गोपनीय आणि संवेदनशील माहिती आणि कागदपत्रे पाठवत होता, तसेच पैशाच्या आमिषानेही तो हेरगिरी करू लागला होता.
- मात्र, याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.
- आरोपींकडून अनेक मुलींचे फोटो आणि व्हिडिओ सापडल्याचे सांगण्यात येत आहे.
- मात्र, अधिकृत वक्तव्य समोर आल्यानंतरच परराष्ट्र मंत्रालयाच्या ड्रायव्हरला कसे गोवण्यात आले आहे, हे स्पष्ट होईल.
याआधीही भारतात हेरगिरीची कामे घडली!!
- लष्करासह इतर उच्च पदांवर बसलेले अधिकारी अनेकदा हनी ट्रॅपद्वारे अडकतात, परंतु पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने ड्रायव्हरला लक्ष्य करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
- भारतामध्ये याआधीही अशा प्रकरणांमध्ये काही लोकांना अटक करण्यात आली आहेत.
- महत्वाच्या खात्यातील, विभागातील लोकांना अडकवून त्यांच्याकडून हेरगिरीची कामे करवून घेण्याची प्रकरणे याआधीही भारतात घडल्या आहेत.