मुक्तपीठ टीम
कोरोनाची स्थिती पाहता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइनच होणार आहेत. परीक्षेच्या तारखा ही जाहीर करण्यात आल्या आहेत अशी माहिती मिळालेली आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन की, ऑफलाईन होणार याविषयीच्या चर्चा रंगल्या होत्या. आता १५ फेब्रुवारीपासून परीक्षांना सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. तर, या परीक्षेसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची मुदत २० जानेवारीपर्यंत देण्यात आली आहे. विद्यापीठ प्रशासन आता ऑनलाईन परीक्षा घेण्यासाठी कोणती यंत्रणा वापरणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
पुणे, नाशिक, अहमदनगर जिल्ह्यातील विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील आतापर्यंत ६ लाख १० हजार १२० विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठीचे अर्ज दाखल केले आहेत. २०१९ च्या पँटर्ननुसार परीक्षा घेतली जाणार आहे तसेच, १०० टक्के अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा होणार असल्याचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परीक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार स्पष्ट केले आहे.
मागील काही दिवसांपासून ऑनलाईन परीक्षेचे काम कोणत्या एजन्सीला द्यायचे यावर विद्यापीठाचा निर्णय झालेला नव्हता आणि याबद्दलच्या चर्चा रंगल्या होत्या परंतु, विद्यापीठाने आता परीक्षेच्या तारखा जाहीर केल्या आहेत त्यामुळे परीक्षेच्या तारखासंबंधित असलेला प्रश्न आता सुटलेला आहे.