Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत झालं तसं तुमच्यासोबतही घडू शकतं…

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
Beware of fake Phone calls Do not reply to unknown numbers

मुक्तपीठ टीम

खंडणी मागितल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिटने दोन दिवसांपूर्वी सहा जणांना अटक केली. या लोकांनी फेक कॉल अॅपद्वारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल नंबर वापरला आणि एका बिल्डरकडून २० लाख रुपये उकळले. १४ जानेवारीला सकाळी सर्व आरोपींना शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही बातमी जरी मुक्तपीठनं आधी दिली असली तरी आज तुम्हाला सावध करायचं आहे, ते अजित पवारांचा नंबर असल्याचं भासवून फसवणूक करण्यासाठी या भामट्यांनी वापरलेल्या फेक कॉल अॅपबद्दल. कारण जे उपमुख्यमंत्रीपदावरील माणसाबद्दल घडलं ते तुमच्यासोबतही घडू शकतं आणि व्यावसायिक किंवा वैयक्तिक नुकसानही!

 

या सायबर क्राईम गुन्ह्यात बिल्डरला २० लाखांचा गंडा घालण्यात आला. आरोपींनी गुगल प्ले स्टोअरवरून ‘फेक कॉल अॅप’ डाउनलोड केला होता. या अॅपच्या माध्यमातून त्यांनी बिल्डरला फोन केला असता त्यांच्या मोबाइल स्क्रीनवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाइल क्रमांक आला. त्यांनी स्वत:ला उपमुख्यमंत्र्यांचे पीए चौगुले असल्याचे सांगून प्रकल्प थांबवण्याची धमकी देत ​​२० लाख रुपयांची मागणी केली. बिल्डरही त्यांच्या जाळ्यात सापडला आणि त्याने ठरलेल्या ठिकाणी जाऊन आरोपींना २० लाख रुपये रोख दिले. जमिनीच्या वादात आरोपींनी बिल्डरला मागे हटण्याची धमकीही दिली होती. त्यामुळे बिल्डरला त्याच्यावर संशय आला आणि प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले.

 

फेक कॉल अॅपविषयीची संदर्भात माहिती

  • जेव्हा आपण एखाद्याला कॉल करतो तेव्हा त्याच्या मोबाईलमध्ये आपला मोबाइल नंबर दिसतो, परंतु जर तुम्ही फेक कॉल अॅपवरून कॉल केलात तर त्याला तुमच्या वतीने फक्त फेक किंवा इतर कोणाचा मोबाईल नंबर एंटर केलेला दिसेल.
  • फेक कॉलमध्ये समोरच्या व्यक्तीला कोणी कॉल केला हे कळत नाही.
  • जर तुमचा मोबाईल नंबर ०००००० असा केला तर तोच नंबर समोर दिसून येईल.
  • काही बनावट आयडी कॉलमध्ये, आपल्याला स्वत:चा आवाज पुरुष किंवा महिलेच्या आवाजातही बदलता येते.
    असे अॅप बनवणारे बहुतेक लोक प्रँक कॉल अॅपद्वारे गुगल प्ले स्टोअरवर लिस्टेड करतात, परंतु त्याचा सहजपणे गैरवापर केला जाऊ शकतो.
  • गेल्या काही महिन्यांत गुगलने अशा अनेक फेक कॉल अॅप्सवर प्ले स्टोअरवरून बंदी घातली आहे.

Tags: Deputy Chief Minister Ajit PawarFake Call Appfraud callsUnknown Numbersउपमुख्यमंत्री अजित पवारफेक कॉल अॅप
Previous Post

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाइनच, अर्ज आणि परीक्षेच्या तारखा जाहीर!

Next Post

लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण! पंतप्रधानांनी केले लसीकरण मोहिमेशी संबंधितांचे अभिवादन!

Next Post
one Year Of Vaccine Drive

लसीकरण मोहिमेला एक वर्ष पूर्ण! पंतप्रधानांनी केले लसीकरण मोहिमेशी संबंधितांचे अभिवादन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!