मुक्तपीठ टीम
स्पाईसजेट विमानसेवा निवडणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता स्पाईसजेट फ्लाइटमध्ये लवकरच इंटरनेट सेवा मिळणार आहे. स्पाइसजेटच्या सीएमडीच्या म्हणण्यानुसार, लवकरच विमानांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू होण्याची अपेक्षा आहे. पुढील काही महिन्यांत आणखी बोईंग ७३७ मॅक्स विमाने आणण्याची स्पाईसजेटची योजना आहे. लवकरच त्यांच्या विमानांमध्ये ब्रॉडबँड इंटरनेट सेवा सुरू होईल अशी अपेक्षा आहे. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांनी ही माहिती दिली.
स्पाईसजेट विमान क्षमतेविषयी सविस्तर माहिती
- स्पाईसजेट एअरलाइन्सकडे ९१ विमानांचा ताफा आहे.
- या ताफ्यापैकी १३ मॅक्स विमाने आहेत आणि ४६ बोईंग ७३७ विमानांची जुनी आवृत्ती आहे.
- स्पाइसजेटच्या अधिकृत वेबसाइटनुसार ही माहिती मिळाली आहे. एअरलाइनच्या १७ व्या वर्धापनदिनानिमित्त कर्मचार्यांना केलेल्या ईमेलमध्ये सिंह म्हणाले की, वाहक दर महिन्याला सर्वाधिक लोडसह उड्डाण करत आहे आणि येत्या काही महिन्यांत अधिक उड्डाण करण्याची अपेक्षा आहे.
आणखी मॅक्स विमानांचा ताफ्यात समावेश करण्यात येणार
- स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह म्हणाले की, बोईंग ७३७ मॅक्स आमच्या ताफ्यात सेवेत परतले आहे आणि प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- पुढील काही महिन्यांत, आमची सर्व जुनी विमाने बदलण्याच्या ध्येयाने आम्ही आमच्या ताफ्यात आणखी बरीच मॅक्स विमाने जोडणार आहोत.
स्पाईसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांनी सांगितले की, “स्पाईसजेटच्या रूट नेटवर्कचा विस्तारही भारतातील आणि जगभरातील अद्वितीय आणि नवीन रोमांचक स्थळांचा समावेश करण्यासाठी केला जाईल. स्पाइसजेटने कोरोना संकट आपल्या देशासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. स्पाईसजेटने १ लाखांहून अधिक ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भारतात आणले आहेत, तेही अशा वेळी जेव्हा त्यांची सर्वात जास्त गरज होती. आम्ही देशातील कोरोना लसींचे पहिले आणि सर्वात मोठे वाहतूकदार होतो.”