Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी AI कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
roads

मुक्तपीठ टीम

भारतातील रस्ते वाहतूक अधिक सुरक्षित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर लवकरच केला जाऊ शकेल. याचा शुभारंभ गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला होता. रस्त्यावरील धोके ओळखून, वाहनांच्या संभाव्य धडकेविषयी चालकांना वेळेत जागृत करणे, रस्ते सुरक्षेत अनेक सुधारणा करणे यासाठी आय रास्ते हा एक वैशिष्ट्यपूर्ण कृत्रिम बुद्धिमत्ता दृष्टिकोन असलेला प्रकल्प आहे. रस्ते अपघात मोठ्या प्रमाणावर कमी करण्याच्या उद्देशाने तो नागपूर शहरात अमलात आणला जात आहे.

नागपूर इथला हा प्रकल्प ‘तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीद्वारे रस्ते सुरक्षेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक उपाययोजना’ [‘Intelligent Solutions for Road Safety through Technology and Engineering’ (iRASTE)],वापरुन, चालकांना जागृत करेल. तसेच वाहन चालविताना अपघात प्रवण परिस्थिती शोधेल आणि या बाबत वाहन चालकांना प्रगत चालक सहाय्य व्यवस्थेच्या [Advance Driver Assistance System (ADAS)] माध्यमातून माहिती देईल. सगळ्या रस्त्यांवरील वाहतुकीचे आणि इतर माहितीचे विश्लेषण करून या प्रकल्पात ‘त्रुटी असलेली ठिकाणे’ शोधली जातील. काही ठिकाणे म्हणजे जिथे सहसा लक्ष दिले जात नाही ती जीवघेण्या अपघातांची केंद्रे बनू शकतात. या व्यवस्थेत रस्त्यांवर सातत्याने देखरेख ठेवली जाते आणि आरेखन अभियांत्रिकीच्या मदतीने अपघातप्रवण ठिकाणे तसेच रस्ते पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केली जाते.

iRASTE प्रकल्प आय-हब फाऊंडेशन , भारतीय तंत्रज्ञान संस्था, हैद्राबाद, तंत्रज्ञान नवोन्मेष केंद्र, जे विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मदतीने सुरु करण्यात आलेल्या डाटा बँक्स आणि डाटा सेवा अंतर्गत, आंतरशाखीय सायबर भौतिक व्यवस्था राष्ट्रीय मिशन, अप्लाइड कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधन संस्थेच्या (INAI) मदतीने राबविण्यात येत आहे. या प्रकल्पात सीएसआयआर-सीआरआरआय आणि नागपूर महानगरपालिका यांचाही सहभाग आहे तसेच महिंद्रा आणि इंटेल उद्योग यात भागीदार आहेत.

हे केंद्र मूळ आणि अप्लाईड विस्तारित डाटा चलित तंत्रज्ञानाचा समन्वय, एकत्रीकरण आणि देशभरात प्रसार करण्याचे काम करते. भविष्यात संशोधक, स्टार्टअप्स आणि उद्योग क्षेत्राला, मुख्यत्वे करून लहान अंतराची वाहतूक, आरोग्यसेवा तसेच स्मार्ट इमारती यासाठी याचा उपयोग व्हावा, यासाठी हे असे महत्वाचे स्रोत तयार करण्याचा प्राथमिक उद्देश आहे

iRASTE प्रकल्प आणखी एकमेवाद्वितीय असण्याचे आणखी एक कारण म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञान वापरून भारतीय परिस्थिती अनुरूप आराखडा तयार करून प्रत्यक्ष उपाय शोधले जात आहेत. नागपूर शहरात सुरवातीला अंमलबजावणी करून iRASTE प्रकल्प इतर शहरात देखील वापरण्याचे ध्येय आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: AIArtificial Intelligencegood newsIndiamuktpeethRoad Traffic Safetyकृत्रिम बुद्धिमत्ताचांगली बातमीभारतमुक्तपीठरस्ते वाहतूक सुरक्षा
Previous Post

पर्यटकांसाठी महाबळेश्वर एका क्लिकवर, ‘बिज्जो’चं ‘गो महाबळेश्वर’ अॅप

Next Post

स्पाईसजेटच्या विमानात आता लवकरच प्रवाशांना मिळणार इंटरनेट सेवा

Next Post
spicejet

स्पाईसजेटच्या विमानात आता लवकरच प्रवाशांना मिळणार इंटरनेट सेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!