Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

फक्त १०% बैल, ९०% गायी! महाराष्ट्रासह तामिळनाडूत नव्या विर्याचं यशस्वी परीक्षण! नवा वाद!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
cows

मुक्तपीठ टीम

गुरांच्या बाबतीत शेतकरी मादी गुरांनाच प्राधान्य देतात. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याकडे मादी वासरू जन्माला येते तेव्हा काही दिवसांनी त्याची विक्री केली जाते. पण गाय किंवा म्हैस जन्माला आली तर राखली जाते, कारण त्यांचा उपयोग दूध उत्पादनासाठी होतो. शेतकऱ्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि गुरांची नर संतती होऊ नये यासाठी एक खास तंत्र विकसित करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे आणि चाचण्यांमध्ये ८७ ते ९० टक्के यश मिळाले आहे. म्हणजेच, या विशेष तंत्राच्या वापराने, ९० टक्के फक्त गायींचा जन्म होईल, तर केवळ १० टक्के बैल जन्माला येतील. खास बाब म्हणजे या विर्याच्या महाराष्ट्रासह तामिळनाडूत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, निसर्गाच्या चक्रात बदल करण्याच्या या तंत्रामुळे नर-मादी असमतोल होण्याचा आरोप करत नवा वाद उफाळण्याचीही शक्यता आहे.

मादी गुरांची संख्या वाढवणार तंत्रज्ञान कसे असणार?

  • दुध देणाऱ्या गुरांची उत्पादकता वाढवण्यासाठी हे विशेष तंत्रज्ञान लवकरच देशातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • ते शेतकऱ्यांना परवडणारे आणि उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
  • खरं तर, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या एका उपकंपनीने लिंग-वर्गीकृत वीर्य चाचणी यशस्वीपणे केली आहे.
  • याद्वारे गुरे फक्त मादी वासरू देतात. सध्या, जगभरात फक्त दोन कंपन्या लिंग-सॉर्टेड वीर्य डोस तयार करतात.

हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स -बंगळुरू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- चेन्नई आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस बंगळुरूस्थित जिवा सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त संशोधनांतर्गत विकसित केले गेले आहे. या सर्व संस्थांनी लिंगानुसार क्रमवारी लावलेले वीर्य डोस स्वस्त आणि परिणामकारक बनवण्यात मोठे यश मिळवले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये याच्या क्षेत्रीय चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. केवळ मादी जन्माला येण्याच्या यशाचे प्रमाण ९० टक्के आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे.

जनावरांसाठी लिंगयुक्त वीर्यच्या कृत्रिम गर्भाधानेच्या किंमती

  • लिंगयुक्त वीर्यच्या कृत्रिम गर्भाधानाची किंमत सध्या फक्त १,५०० ते २,००० रुपयांपर्यंत आहे.
  • गुरांना एकापेक्षा जास्त डोसची आवश्यकता असल्यास, एकूण खर्च प्रति गुरांसाठी ४ हजार रुपये होतो.
  • हे शेतकऱ्यांना थोडे महागातही ठरते, मात्र आता स्वदेशी तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर ही समस्याही दूर होणार आहे.
  • स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेले हे विशेष लिंगयुक्त वीर्य व्यावसायिकरित्या लॉंच केले जाईल.
  • त्याची किंमत प्रति डोस २५० रुपये असेल, जी सध्याच्या लिंगयुक्त वीर्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी अधिक किफायतशीर आहे.

Tags: BullsCattle Semen TestingCowsDairy AnimalsMaharashtramuktpeethNew ControversyTamil Naduगायीगुरांचे विर्य परीक्षणघडलं-बिघडलंतामिळनाडूदुग्धजन्य प्राणीनवा वादबैलमहाराष्ट्रमुक्तपीठ
Previous Post

Cybernetik announces Global Partnership Program to collaborate with companies across the globe in robotics and process automation

Next Post

आधी आदित्य ठाकरे, आता राहुल गांधी! बाल आयोगाची नोटीस!!

Next Post
Congress leader Rahul Gandhi

आधी आदित्य ठाकरे, आता राहुल गांधी! बाल आयोगाची नोटीस!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!