मुक्तपीठ टीम
गुरांच्या बाबतीत शेतकरी मादी गुरांनाच प्राधान्य देतात. जेव्हा एखाद्या शेतकऱ्याकडे मादी वासरू जन्माला येते तेव्हा काही दिवसांनी त्याची विक्री केली जाते. पण गाय किंवा म्हैस जन्माला आली तर राखली जाते, कारण त्यांचा उपयोग दूध उत्पादनासाठी होतो. शेतकऱ्यांची ही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि गुरांची नर संतती होऊ नये यासाठी एक खास तंत्र विकसित करण्यात आले आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे आणि चाचण्यांमध्ये ८७ ते ९० टक्के यश मिळाले आहे. म्हणजेच, या विशेष तंत्राच्या वापराने, ९० टक्के फक्त गायींचा जन्म होईल, तर केवळ १० टक्के बैल जन्माला येतील. खास बाब म्हणजे या विर्याच्या महाराष्ट्रासह तामिळनाडूत चाचण्या घेण्यात आल्या आहेत. मात्र, निसर्गाच्या चक्रात बदल करण्याच्या या तंत्रामुळे नर-मादी असमतोल होण्याचा आरोप करत नवा वाद उफाळण्याचीही शक्यता आहे.
मादी गुरांची संख्या वाढवणार तंत्रज्ञान कसे असणार?
- दुध देणाऱ्या गुरांची उत्पादकता वाढवण्यासाठी हे विशेष तंत्रज्ञान लवकरच देशातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
- ते शेतकऱ्यांना परवडणारे आणि उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- खरं तर, नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डच्या एका उपकंपनीने लिंग-वर्गीकृत वीर्य चाचणी यशस्वीपणे केली आहे.
- याद्वारे गुरे फक्त मादी वासरू देतात. सध्या, जगभरात फक्त दोन कंपन्या लिंग-सॉर्टेड वीर्य डोस तयार करतात.
हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स -बंगळुरू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी- चेन्नई आणि नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस बंगळुरूस्थित जिवा सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त संशोधनांतर्गत विकसित केले गेले आहे. या सर्व संस्थांनी लिंगानुसार क्रमवारी लावलेले वीर्य डोस स्वस्त आणि परिणामकारक बनवण्यात मोठे यश मिळवले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्ये याच्या क्षेत्रीय चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. केवळ मादी जन्माला येण्याच्या यशाचे प्रमाण ९० टक्के आहे. हे तंत्रज्ञान पूर्णपणे स्वदेशी आहे.
जनावरांसाठी लिंगयुक्त वीर्यच्या कृत्रिम गर्भाधानेच्या किंमती
- लिंगयुक्त वीर्यच्या कृत्रिम गर्भाधानाची किंमत सध्या फक्त १,५०० ते २,००० रुपयांपर्यंत आहे.
- गुरांना एकापेक्षा जास्त डोसची आवश्यकता असल्यास, एकूण खर्च प्रति गुरांसाठी ४ हजार रुपये होतो.
- हे शेतकऱ्यांना थोडे महागातही ठरते, मात्र आता स्वदेशी तंत्रज्ञान विकसित झाल्यानंतर ही समस्याही दूर होणार आहे.
- स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेले हे विशेष लिंगयुक्त वीर्य व्यावसायिकरित्या लॉंच केले जाईल.
- त्याची किंमत प्रति डोस २५० रुपये असेल, जी सध्याच्या लिंगयुक्त वीर्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी अधिक किफायतशीर आहे.