Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाण्यात अवजड वाहनांसाठी पार्किंगच्या जागा होणार निश्चित

 वाहतूक कोंडीची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दखल, नवी मुंबई, खारेगाव, शहापूर, दापचारी येथे होणार पार्किंग लॉट

September 28, 2021
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
Thane

मुक्तपीठ टीम

 

ठाणे शहरातील मुख्य महामार्ग व घोडबंदर रस्त्यावर सोमवारी पुन्हा झालेल्या वाहतूक कोंडीची तातडीने दखल घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित यंत्रणांची बैठक घेतली आणि अवजड वाहनांसाठी पार्किंग लॉटच्या जागा निश्चित करण्याचे आदेश दिले.  एकनाथ शिंदे बुधवारी स्वतः नवी मुंबई, खारेगाव, शहापूर आणि दापचारी येथील मोकळ्या जागांची पाहणी करणार आहेत.

 

ठाणे शहरात गेल्या काही दिवसात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यांवर पडलेले खड्डे, शहरात चालू असलेली विकासकामे यामुळे या वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई-अहमदाबाद रस्त्यावरील वर्सोवा पूल आणि मुंब्रा बायपास दुरुस्तीचे काम चालू असल्याने बरीचशी अवजड वाहने ठाणे मार्गे पुढे जात होती. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर अभूतपूर्व वाहतूककोंडी होऊन त्यात नागरिकांना तासनतास अडकून पडावे लागत होते. त्यातच सोमवारी मध्यरात्री टँकर उलटल्यामुळे पुन्हा एकदा घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने ठाणे पोलिस, वाहतूक पोलिस, ग्रामीण पोलिस, ठाणे महापालिका आदी यंत्रणांची बैठक घेतली. या बैठकीस ठाणे ग्रामीण विभागाचे पोलिस अधीक्षक विक्रम देशमाने, ठाणे पोलिसांच्या वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त विनय राठोड, मीरा भाईंदरचे पोलीस उपायुक्त विजयकांत सागर, ठाणे महापालिकेचे कार्यकारी अभियंता रामदास शिंदे आणि इतर अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर रोडवर गायमुख येथे तेल वाहून नेणारा टँकर उलटल्यामुळे सोमवारी वाहतूक कोंडी झाल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

 

रस्त्यावरील कोंडी कमी करण्यासाठी रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत अवजड वाहने शहराच्या बाहेर पार्किंग लॉट तयार करून तिथे अडवून टप्प्या-टप्प्याने पुढे सोडण्याचा निर्णय शनिवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार, बुधवारी या जागांची पालकमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करणार आहेत.

 

जेएनपीटीतून निघणारी वाहने जेएनपीटीच्या शेजारील पार्किंग लॉटमध्ये थांबवण्यात येणार आहेत. मुंबई-नाशिक महामार्गावर नाशिकवरून मुंबईकडे येणारी वाहने थांबवण्यासाठी खर्डी-सोनाळे-दापोडे येथे, अहमदाबाद येथून मुंबईत येणारी वाहने दापचारी येथे तर ठाणे शहरात येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी खारेगाव टोल नाक्याच्या दोन्ही बाजूस पार्किंग लॉट तयार करण्यात येणार आहेत. या ठिकाणी अवजड वाहने रोखून वाहतूक विभागाच्या माध्यमातून नियोजनबद्धरित्या  टप्याटप्याने ही वाहने शहरात सोडण्यात येतील, जेणेकरून वाहतुकीचे नियोजन करणे शक्य होईल. पालकमंत्री शिंदे हे स्वतः या नियोजित पार्किंग लॉटच्या जागांची पहाणी करणार असून त्यानंतर या पार्किंगच्या जागावर शिक्कामोर्तब करण्यात येईल.

 

ठाणे शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची डागडुजी आणि दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत हे नियोजन असेल. त्यामुळे ठाणे शहरावर अवजड वाहतुकीचा ताण कमी होऊन वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


Tags: Eknath ShindeRamdas Shindethane municipal corporationThane Policetrafficएकनाथ शिंदेट्रॅफिकठाणे पोलिसठाणे महापालिकारामदास शिंदे
Previous Post

महाराष्ट्रातील देगलूर-बिलोलीसह देशभरातील ३ लोकसभा, ३० विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर!

Next Post

“सारथी तसेच बार्टीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश कौतुकास्पद”

Next Post
sarthi barti

"सारथी तसेच बार्टीच्या विद्यार्थ्यांचे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील यश कौतुकास्पद"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!