Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीटर अकाऊंट हॅकिंग तपासासाठी खास टीम!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
modi

मुक्तपीठ टीम

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट रात्री उशिरा हॅकर्सनी हॅक करून तीन मिनिटांत दोन ट्विट केले. त्यामुळे शासकीय विभागात खळबळ उडाली आहे. हे ट्विट रात्री उशिरा २ वाजून ११ मिनिट ते २ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान करण्यात आले. त्याचवेळी या घटनेनंतर सरकार आता जागृक झाली आहे. हॅकर्सचा शोध घेण्यासाठी अधिकारी आता प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने याची चौकशी करण्यासाठी एक विशेष टीम नेमली आहे, जी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हॅकर्सचा शोध घेईल.

 

हॅकरच्या बिटकॉइन ट्वीटमुळे ‘बिटकॉइन माफिया’वर संशय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याची माहिती सोशल मीडियावर येताच व्हायरल झाली. युजर्सनी यासंदर्भात स्क्रीनशॉट शेअर करून आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हॅशटॅग हॅक झाले आणि हॅकर्सचा ट्रेंड सुरू झाला. हॅशटॅग हॅक्ड हा भारतात चौथ्या क्रमांकावर रात्रभर ट्रेंड करत होता.

 

तपासासाठी सर्ट-इन टीमची नियुक्ती

  • हॅकर्सचा शोध घेण्यासाठी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजेच सर्ट-इन या टीमवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
  • सर्ट-इन ही केंद्र सरकारची विशेष तपास यंत्रणा आहे जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
  • भारतातील हॅकिंग आणि फिशिंगसारख्या गंभीर सायबर धोक्यांना तोंड देणे हे या टीमचे काम आहे.
  • हॅकिंग कोठून, कसे आणि कोणी केले ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
  • हॅकिंग शोधण्यासाठी ही टीम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
  • सोशल मीडिया युजर्सनी याला सुरक्षेचा गंभीर धोका म्हटले आहे.
  • हॅकरने केलेले ट्वीट हे बिटकॉइनला मान्यता दिल्यासारखे असल्याने त्यामागे माफिया असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.
  • अनेक ट्विटरकरांनी हॅकिंगला ‘बिटकॉइन माफिया’चे काम म्हटले आहे.

 

हॅकिंगबद्दल ट्विटर काय म्हणते?

  • ट्विटरने या घटनेवर एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.
  • ट्विटर स्पोक्सनुसार, आमच्याकडे पंतप्रधान कार्यालयाशी २४ तास ओपन लाइन संवाद आहे आणि आम्हाला याची माहिती होताच, आमच्या टीमने सध्याचे खाते सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलली.
  • सध्या कोणत्याही धोक्याची चिन्हे नसल्याचे आमच्या तपासातून समोर आले आहे.

 

नेमकं काय घडलं?

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींचे @narendramodi हे वैयक्तिक अधिकृत ट्विटर हँडल आहे.
  • रविवारी, १२ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेच ट्विटर हँडल हॅकर्सनी हॅक केले होते.
  • त्यानंतर हॅकर्सनी भारताने बिटकॉईनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिल्याचे ट्विट केले.
  • तसेच भारत सरकार अधिकृतपणे ५०० बिटकॉइन्स खरेदी करत आहे, असेही ट्वीट त्यांनी केले.
  • ट्विट पहाटे २ वाजून ११ मिनिटांनी करण्यात आले होते, जे दोन मिनिटांत डिलीट करण्यात आले.
  • मात्र ते डिलीट करताच २ वाजून १४ वाजता दुसरे ट्विट करण्यात आले.
  • दोघांमध्ये बिटकॉइनबद्दलच मजकूर होता.
  • नंतर तेही डिलीट करण्यात आले.
  • यानंतर लगेच पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांचे ट्वीटर हँडल काही काळासाठी हॅक झाल्याचे जाहीर केले.
  • तसेच काही वेळातच ते ट्विटर हँडल पुन्हा सुरक्षित करण्यात आले आहे, असेही जाहीर करण्यात आले.

Tags: bitcoincert-in teamcyber crimeHi-tech cyber crimemuktpeethPM Narendra modipmo indiaPrime Minister Modispecial teamtwitter hacktwitter hackingट्विटर हॅकिंगबिटकॉइन माफियामुक्तपीठसर्ट-इन टीम
Previous Post

शरद पवार यांच्या भाषणाच्या ‘नेमकचि बोलणें’ या ग्रंथाचे खासदार संजय राऊत व साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्या हस्ते प्रकाशन

Next Post

आता दोन तासात कळणार ओमायक्रॉनचा संसर्ग! आयसीएमआरने शोधले नवं किट!!

Next Post
omicron

आता दोन तासात कळणार ओमायक्रॉनचा संसर्ग! आयसीएमआरने शोधले नवं किट!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!