मुक्तपीठ टीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर अकाउंट रात्री उशिरा हॅकर्सनी हॅक करून तीन मिनिटांत दोन ट्विट केले. त्यामुळे शासकीय विभागात खळबळ उडाली आहे. हे ट्विट रात्री उशिरा २ वाजून ११ मिनिट ते २ वाजून १५ मिनिटांच्या दरम्यान करण्यात आले. त्याचवेळी या घटनेनंतर सरकार आता जागृक झाली आहे. हॅकर्सचा शोध घेण्यासाठी अधिकारी आता प्रयत्न करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने याची चौकशी करण्यासाठी एक विशेष टीम नेमली आहे, जी अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे हॅकर्सचा शोध घेईल.
हॅकरच्या बिटकॉइन ट्वीटमुळे ‘बिटकॉइन माफिया’वर संशय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर हँडल हॅक झाल्याची माहिती सोशल मीडियावर येताच व्हायरल झाली. युजर्सनी यासंदर्भात स्क्रीनशॉट शेअर करून आपली प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. तेव्हापासून हॅशटॅग हॅक झाले आणि हॅकर्सचा ट्रेंड सुरू झाला. हॅशटॅग हॅक्ड हा भारतात चौथ्या क्रमांकावर रात्रभर ट्रेंड करत होता.
तपासासाठी सर्ट-इन टीमची नियुक्ती
- हॅकर्सचा शोध घेण्यासाठी इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम म्हणजेच सर्ट-इन या टीमवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
- सर्ट-इन ही केंद्र सरकारची विशेष तपास यंत्रणा आहे जी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
- भारतातील हॅकिंग आणि फिशिंगसारख्या गंभीर सायबर धोक्यांना तोंड देणे हे या टीमचे काम आहे.
- हॅकिंग कोठून, कसे आणि कोणी केले ते शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
- हॅकिंग शोधण्यासाठी ही टीम अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.
- सोशल मीडिया युजर्सनी याला सुरक्षेचा गंभीर धोका म्हटले आहे.
- हॅकरने केलेले ट्वीट हे बिटकॉइनला मान्यता दिल्यासारखे असल्याने त्यामागे माफिया असल्याचा संशय व्यक्त केला गेला आहे.
- अनेक ट्विटरकरांनी हॅकिंगला ‘बिटकॉइन माफिया’चे काम म्हटले आहे.
हॅकिंगबद्दल ट्विटर काय म्हणते?
- ट्विटरने या घटनेवर एक निवेदन जारी करून स्पष्टीकरण दिले आहे.
- ट्विटर स्पोक्सनुसार, आमच्याकडे पंतप्रधान कार्यालयाशी २४ तास ओपन लाइन संवाद आहे आणि आम्हाला याची माहिती होताच, आमच्या टीमने सध्याचे खाते सुरक्षित करण्यासाठी आवश्यक पावले उचलली.
- सध्या कोणत्याही धोक्याची चिन्हे नसल्याचे आमच्या तपासातून समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
- पंतप्रधान नरेंद्र मोदींचे @narendramodi हे वैयक्तिक अधिकृत ट्विटर हँडल आहे.
- रविवारी, १२ डिसेंबर रोजी पहाटे २ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हेच ट्विटर हँडल हॅकर्सनी हॅक केले होते.
- त्यानंतर हॅकर्सनी भारताने बिटकॉईनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिल्याचे ट्विट केले.
- तसेच भारत सरकार अधिकृतपणे ५०० बिटकॉइन्स खरेदी करत आहे, असेही ट्वीट त्यांनी केले.
- ट्विट पहाटे २ वाजून ११ मिनिटांनी करण्यात आले होते, जे दोन मिनिटांत डिलीट करण्यात आले.
- मात्र ते डिलीट करताच २ वाजून १४ वाजता दुसरे ट्विट करण्यात आले.
- दोघांमध्ये बिटकॉइनबद्दलच मजकूर होता.
- नंतर तेही डिलीट करण्यात आले.
- यानंतर लगेच पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांचे ट्वीटर हँडल काही काळासाठी हॅक झाल्याचे जाहीर केले.
- तसेच काही वेळातच ते ट्विटर हँडल पुन्हा सुरक्षित करण्यात आले आहे, असेही जाहीर करण्यात आले.