मुक्तपीठ टीम
आयआरसीटीसीने ७ नोव्हेंबरपासून रामायण सर्किट ट्रेन सुरू करणार आहे. या ट्रेनद्वारे रामायणातील भगवान रामाशी संबंधित धार्मिक स्थळांना भेट दिली जाईल. ही ट्रेन १७ दिवसात साडेसात हजार किमी प्रवास करेल. आयआरसीटीसीनुसार, रामायण सर्किट ट्रेन दिल्लीच्या सफदरगंज रेल्वे स्थानकावरून सुटेल.
रामायण सर्किट ट्रेनने कुठचे दर्शन शक्य?
- रामायण सर्किट ट्रेन प्रथम अयोध्येला जाईल. जिथे श्री राम जन्मभूमी मंदिर, श्री हनुमान मंदिर आणि भारत मंदिर या मंदिराचे दर्शन केले जाईल.
- त्यानंतर ट्रेन सीतामढीला जाईल. जिथे जानकीचे जन्मस्थान आणि राम मंदिराला भेट दिली जाईल.
- येथून पुढील स्थानक काशी, चित्रकूट आणि नाशिक असेल.
- नाशिकनंतर ट्रेन हंपीला पोहोचेल. या प्रवासाचे शेवटचे स्थानक रामेश्वरम असेल.
- रामेश्वरम स्थानकावरून ट्रेन दिल्लीला परत येईल.
रामायण स्थळ दर्शन सर्किट ट्रेनचे तिकीट किती?
- या प्रवासाचे भाडे एसी प्रथम श्रेणीसाठी १,०२,०९५ रुपये आणि द्वितीय श्रेणीसाठी ८२,९५० रुपये आहे.
- आयआरसीटी च्या वेबसाईटद्वारे तिकीट बुकिंग करता येते.
- तसेच, महत्त्वाची बाब म्हणजे कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले लोकच प्रवास करू शकतात.
श्री रामायण स्थळ दर्शन घेताना रेल्वेकडून कोणत्या सुविधा?
- प्रवाशांना जेवण, पेय आणि राहण्याची सोय मिळेल.
- धार्मिक स्थळांना लक्झरी बसने भेट दिली जाईल.
- एसी हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था केली जाईल.
- यात ग्रंथालय, स्वयंपाकघर, शॉवर सुविधा असलेले बाथरूम आणि शौचालय सुविधा देखील असतील.