Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता गृहकर्जासाठी बँकेत नको पोस्टात चला! इंडिया पोस्ट बँकेची एलआयसीशी भागिदारी!!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
indian post-lic

मुक्तपीठ टीम

आता तुम्हाला जर नवं घर किंवा अन्य मालमत्ता खरेदी करायची असेल तर गृहकर्जासाठी बँकेतच गेलं पाहिजे असं नाही. तुम्हाला आता पोस्ट कार्यालयातूनही मालमत्ता खरेदीसाठी गृहकर्ज सुविधा मिळू शकेल.

 

संचार मंत्रालय, टपाल खात्याच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आणि देशाची प्रमुख गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) हे गृहकर्ज सुविधेसाठी एकत्र आलेयत. ही नवी भागिदारी इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेच्या साडेचार कोटी ग्राहकांना गृह कर्ज उत्पादने पुरवणार आहे.

 

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकचे पोस्ट कार्यालयांमध्ये ६५० शाखांचे मजबूत आणि व्यापक जाळे आहे. एलआयसी हाऊसिंग फायनान्सची गृह कर्ज सुविधा संपूर्ण भारतातील एक लाख ३६ हजारापेक्षा जास्त बँकिंग ऍक्सेस पॉइंट्सद्वारे ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाईल.

 

नेमकं काय ठरलं?

  • संचार मंत्रालय, टपाल खात्याच्या अंतर्गत इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB), आणि देशाची प्रमुख गृहनिर्माण वित्त कंपनी एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (LICHFL) यांच्यात सामंजस्य करार झाला आहे.
  • सर्व गृह कर्जासाठी क्रेडिट अंडरराइटिंग, प्रोसेसिंग आणि वितरण हे एलआयसीएचएफएल करेल आणि सोर्सिंगसाठी आयपीपीबी जबाबदार असेल.
  • एलआयसीएचएफएलसोबतची भागीदारी ही आयपीपीबीची उत्पादने आणि सेवांची श्रेणी वाढवण्याच्या आणि देशभरातील वैविध्यपूर्ण ग्राहकांच्या बँकिंग आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्या धोरणाचा एक भाग आहे.
  • सध्या, आयपीपीबी अग्रगण्य विमा कंपन्यांसह भागीदारीद्वारे विविध सामान्य आणि जीवन विमा उत्पादने वितरीत करत आहे आणि ग्राहकांसाठी कर्ज सहजतेने मिळण्यासाठी हा सेवा विस्तार आहे.

 

आयपीपीबीचे सुमारे २००,००० टपाल कर्मचारी (पोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक) मायक्रो-एटीएम आणि बायोमेट्रिक उपकरणांसह सुसज्ज असून नावीन्यपूर्ण डोअरस्टेप बँकिंग सेवेद्वारे एलआयसीएचएफएलचे गृहकर्ज देण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतील

 

एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, पगारदार व्यक्तींसाठी ५० लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी ६.६६% दराने गृह कर्ज देते. देण्यात आलेला व्याजाचा दर कर्जदाराच्या पत संबंधी पात्रतेशी जोडलेला आहे, जो त्यांच्या सिबिल स्कोअरमध्ये दिसून येतो.

एलआयसी हाऊसिंग फायनान्सचे ज्य़ेष्ठ नागरिकांसाठी कर्ज

  • गृहवरिष्ठ – हे पीएसयू विमाधारक, केंद्र/राज्य सरकार, रेल्वे, संरक्षण, बँकांचे सेवानिवृत्त किंवा कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी आहे.
  • ज्यात परिभाषित लाभ पेन्शन योजनेअंतर्गत ते निवृत्तिवेतनासाठी पात्र आहेत. कर्ज घेण्याच्या वेळी कर्जदाराचे वय ६५ वर्षांपर्यंत असू शकते.
  • कर्जाची मुदत ८० वर्षे पूर्ण होईपर्यंत किंवा जास्तीत जास्त ३० वर्षांपर्यंत,यापैकी जे आधी असेल.
  • या उत्पादनाअंतर्गत एलआयसी एचएफएल कर्जदाराला कर्जाच्या कार्यकाळात ६ हप्ते माफ करते.

Tags: licLICHFLआयपीपीबीएलआयसीपोस्टमन आणि ग्रामीण डाक सेवक
Previous Post

अयोध्या ते रामेश्वरम…खास रामायण सर्किट ट्रेन! रामायणातील स्थळांचं एकाच फेरीत दर्शन!

Next Post

पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई- पीक पाहणी ॲप डाऊनलोड! कशी नोंदवाल ॲपमध्ये पीक पाहणी?

Next Post
E-Peek

पंधरा लाखांवर शेतकऱ्यांनी केले ई- पीक पाहणी ॲप डाऊनलोड! कशी नोंदवाल ॲपमध्ये पीक पाहणी?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!