मुक्तपीठ टीम
अॅमेझॉनचे जेफ बेझोस यांच्या ब्लू ओरिजिन कंपनीच्या खासगी अंतराळ पर्यटनाच्या भन्नाट कल्पनेविषयी तुम्ही ऐकलं असेलच. आता पहिल्या अंतराळ पर्यटनासाठी एका व्यक्तीला जेफ बेझोसबरोबर प्रवास करण्यासाठी निवडले गेले आहे. या व्यक्तीची निवड लिलावाद्वारे करण्यात आली आहे. अंतराळ पर्यटनाच्या एकमेव तिकिटासाठी या व्यक्तीने तब्बल २८५ कोटी रुपये दिले आहेत.
अंतराळ पर्यटनाची महागडी क्रेझ
- एका सीटसाठी ७,६०० लोकांची नोंदणी
- ब्लू ओरिजिनच्या वेबसाइटवर अंतराळ पर्यटनाची माहिती उपलब्ध आहे.
- न्यू शेफर्डमध्ये प्रवास करणार्या एकमेव सीटसाठी एका प्रवाशाची निवड ऑनलाइन लिलावाद्वारे करण्यात आली.
- सीट विजेत्याने या प्रवासासाठी तब्बल २८५ कोटी रूपयांची बोली लावली.
- या एकमेव जागेसाठी १५९ देशांमधील ७,६०० लोकांनी नोंदणी केली होती.
- लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर येत्या आठवड्यात विजेत्याच्या नावाची घोषणा केली जाईल.
- त्यानंतर चौथ्या आणि अंतिम क्रू सदस्याचे नाव जाहीर केले जाईल.
सीईओपदाच्या राजीनामा देऊन जेफ बेझोस अंतराळात
- ब्लू ओरिजिनची पहिले प्रवासी विमान २० जुलै रोजी टेक्सासच्या लॉन्च साइटवरून उड्डाण करेल.
- अॅमेझॉनचे सीईओ जेफ बेझोस यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते की, या पहिल्या विमानात तो आपला भाऊ मार्क यांच्यासह अंतराळात जाईल.
- ब्लू ओरिजिन ही जेफ बेझोसची कंपनी आहे.
- जेफ बेझोस ५ जुलैला अॅमेझॉनच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यांच्यानंतर अँडी जेसी अॅमेझॉनचे सीईओ होतील.
अंतराळ पर्यटनातून आलेला पैसा शिक्षणासाठी…
- ब्लू ओरिजिनने आधी अशी माहिती दिली होती की, पहिल्या प्रवासी विमानाच्या एका सीटच्या लिलावातून मिळालेला पैसा कंपनीच्या फाउंडेशनला मिळेल.
- हा भविष्यकाळातील एक क्लब आहे जो गणित आणि विज्ञानाच्या शिक्षणाला प्रोत्साहन देतो.
- हा प्रवास ११ मिनिटांचा असेल.
- यावेळी उड्डाण १०० किलोमीटर (६२ मैल) उंचीवर जाईल.
- या उड्डाणातील अंतराळ प्रवासी करमन लाइनपर्यंत प्रवास करतील. हे पृथ्वीच्या वातावरण आणि अवकाशातील सीमा म्हणून ओळखली जाते.
ग्राहकांना मिळणार चार दिवसांचा अनुभव
- प्रवास करणाऱ्यांना अंतराळात एकूण ४ दिवसांच्या प्रवास अनुभव मिळेल.
- यात ३ दिवसांच्या पूर्व-उड्डाण प्रशिक्षणांचा समावेश आहे.
- टेक्सासच्या वेन हॉर्नमधील कंपनीच्या लाँच साइटवर हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
- या प्रशिक्षणादरम्यान, ब्लू ओरिजिनद्वारे खाण्यापिण्याच्या सर्व प्रकारच्या सुविधा पुरविल्या जातील.