Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पोहचलेल्या रशियन अंतराळवीरांच्या स्पेस सुटचा रंग युक्रेनच्या राष्ट्रध्वजासारखा का?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Space suite

मुक्तपीठ टीम

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध भडकलेले असतानाच घडलेली एक घटना आश्चर्य निर्माण करणारी आहे. तीन रशियन अंतराळवीर पृथ्वीवरून नुकतेच आंतरराष्ट्रीय अंतराळ केंद्रात पोहचले आहेत. त्या अंतराळवीरांनी कझाकस्तानमधील बॅकोनर प्रक्षेपण केंद्रातून उड्डाण केले आणि नियुक्त कक्षेत सुरक्षितपणे पोहोचले. ज्या रशियन अंतराळवीरांनी उड्डाण केले त्यांची नावे आलेग अर्तेमयेव, डेनिस मॅतवेयेव्ह आणि सर्गेई कोरसाकोव्ह अशी आहेत. सोयुझ एमएस-२१ रॉकेटने प्रवास करत हे तीन रशियन अंतराळवीर आयएसएसवर पोहोचले. पण त्यांच्या स्पेससुटचे रंग पाहून इतर देशांच्या अंतराळवीरांना धक्काच बसला.

 

रशियन अंतराळ एजन्सी रॉस्कोस्मोसने दिलेल्या माहितीनुसार तिन्ही अंतराळवीरांनी यशस्वीरित्या कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर ते स्पेस स्टेशनमध्ये दाखल झाले. गेल्या महिन्यात, अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाने युक्रेनमध्ये युद्ध पुकारल्यानंतर मॉस्कोच्या एरोस्पेस उद्योगाला लक्ष्य करत निर्बंधांची घोषणा केली. अशा परिस्थितीत रशियाच्या या मोहिमेकडे खास लक्ष होते.

 

रॉस्कोस्मोसचे प्रमुख रोगोझिन यांनी ट्विट करत लिहिले की, रशियातून प्रथमच संपूर्ण रशियन क्रू अंतराळात पोहोचला आहे. या कामात अमेरिकेच्या मदतीची गरज होती. तर आयएसएसमधील प्रोपल्शन आणि अॅटीट्यूड रशियाच्या नियंत्रणाखाली आहे. १९९० च्या दशकात स्पेस स्टेशन स्थापन झाल्यापासून दोन्ही देश एकमेकांवर अवलंबून आहेत. अंतराळ स्थानक कक्षेत राहण्यासाठी रशियाची मदत आवश्यक असते.

 

स्पेस स्टेशनमध्ये पोहोचलेल्या रशियन अंतराळवीरांचे स्पेस सूट लक्षवेधी

  • जेव्हा तीन रशियन अंतराळवीर आलेग अर्तेमयेव, डेनिस मॅतवेयेव्ह आणि सर्गेई कोरसाकोव्ह आयएसएसवर पोहोचले, तेव्हा तेथे आधीच उपस्थित असलेले अमेरिकन, रशियन आणि जर्मन अंतराळवीर थक्क झाले.
  • तिन्ही रशियन अंतराळवीर पिवळ्या आणि निळ्या स्पेस सूटमध्ये होते. हा युक्रेनच्या राष्ट्रध्वजाचा रंग आहे.
  • युक्रेन युद्धादरम्यान आयएसएसपर्यंत पोहोचलेल्या या अंतराळवीरांना पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले.
  • तीन तासांच्या आरामदायी प्रवासानंतर रशियन कॉस्मोनॉट कॅप्सूल अंतराळ स्थानकाजवळ पोहोचले.
  • आधीच उपस्थित असलेले दोन रशियन, चार अमेरिकन आणि एक जर्मन अंतराळवीरांनी या तिघांचेही स्वागत केले.

 

स्पेस सूटसाठी हाच रंग का?

  • रशियन सरकार आणि अंतराळ संस्थेने पिवळ्या-निळ्या स्पेस सूटमध्ये अंतराळवीर का पाठवले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
  • अंतराळवीरांना त्यांच्या स्पेससुटबद्दल विचारले असता, प्रत्येकाने त्यांच्या आवडीचा हा रंग निवडल्याचे सांगितले.
  • आम्हाला स्पेस सूटचा रंग निवडण्याचे स्वातंत्र्य होते, म्हणून आम्ही ते निवडले. आमच्याकडे अनेक पिवळ्या वस्तू होत्या, त्यामुळे त्यांचा वापर करणे आवश्यक होते.

Tags: International Space StationmuktpeethRussia-Ukraine WarRussian governmentRussian space agency RoscosmosSpace suiteइंटरनॅशनल स्पेस स्टेशनमुक्तपीठरशियन अंतराळ एजन्सी रॉस्कोस्मोसरशियन सरकाररशिया-युक्रेन युद्धस्पेस सुट
Previous Post

#महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन: विधानपरिषद २१ मार्च २२ (२)

Next Post

आता दहशतवाद्यांच्या फंडिंगचं नेटवर्क मोडणार! अमित शाह यांच्याकडून सुरक्षा यंत्रणांना पूर्ण स्वांतत्र्य!!

Next Post
Amit Shah

आता दहशतवाद्यांच्या फंडिंगचं नेटवर्क मोडणार! अमित शाह यांच्याकडून सुरक्षा यंत्रणांना पूर्ण स्वांतत्र्य!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!