Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आता दहशतवाद्यांच्या फंडिंगचं नेटवर्क मोडणार! अमित शाह यांच्याकडून सुरक्षा यंत्रणांना पूर्ण स्वांतत्र्य!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Amit Shah

मुक्तपीठ टीम

दहशतवाद्यांसाठी निधी उभा करणे आता सोपे राहणार नाही. यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी दहशतवादासाठी निधी गोळा करणाऱ्या दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्यासाठी सुरक्षा यंत्रणांना मोकळीक दिली आहे. काश्मिरी व्यापारी, फुटीरतावादी, पाकिस्तानात बसून दहशतवादासाठी निधी गोळा करणाऱ्या दहशतवादी संघटना यांच्यावर कारवाई करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. शाहा यांनी दहशतवादी फंडिंगचे सर्व नेटवर्क उद्ध्वस्त करण्यास सांगितले आहे.

 

दोन दिवसीय जम्मू-काश्मीर दौऱ्यावर आलेले गृहमंत्री अमित शाह यांनी सुरक्षा यंत्रणांना हे स्वातंत्र्य दिलं आहे. गेल्या वर्षी ३ कोटी रुपयांचे भारतीय चलन जप्त करण्यात आले होते. तुरुंगात बंदिस्त फुटीरतावादी नेता मसरत आलम, यासिन मलिक, शब्बीर शाह, बिट्टा कराटे यांसारख्या लोकांच्या संपर्कात अजूनही अनेक जण असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. जे देश-विदेशात बसून त्यांच्या इशाऱ्यावर निधी उभारत आहेत.

 

एनआयए आणि सर्व गुप्तचर संस्थांकडेही काही लोकांच्या नावांची यादी आहे, जे थेट रडारवर आहेत. त्यांच्यावर लवकरच कारवाई होऊ शकते. याशिवाय राजोरी, पुंछ, कुपवाडा आणि पंजाबमधील काही लोक दहशतवाद्यांसाठी निधी गोळा करत आहेत.

 

काही लोक पंजाबच्या तुरुंगातही आहेत, जे दहशतवाद्यांसाठी निधी गोळा करत आहेत. सुरक्षा यंत्रणांनी अमित शाहा यांना याबाबत माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत दहशतवादी फंडिंगसाठी कुठेही आणि कोणतेही काम सुरू असले तरी त्याचे संपूर्ण नेटवर्क उद्ध्वस्त केले पाहिजे, असे गृहमंत्री शाह यांनी म्हटले आहे. त्यांना यासाठी पूर्ण मुभा आहे.

माजी दहशतवाद्यांवरही सुरक्षा यंत्रणांची नजर

  • येत्या काही दिवसांत याबाबत एनआयए, एसआयए आणि पोलिसांकडून कठोर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.
  • ड्रग्जच्या माध्यमातून दहशतवाद्यांना फंडिंगही केले जात आहे.
  • याबाबत कठोर कारवाई करण्याचीही तयारी सुरू आहे.
  • काही माजी दहशतवाद्यांवरही सुरक्षा यंत्रणांची नजर आहे.

Tags: Amit ShahSecurity AgenciesTerror Funding Networkअमित शाहदहशतवादी फंडिंग नेटवर्कसुरक्षा यंत्रणा
Previous Post

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये पोहचलेल्या रशियन अंतराळवीरांच्या स्पेस सुटचा रंग युक्रेनच्या राष्ट्रध्वजासारखा का?

Next Post

युक्रेनचा चर्चेचा प्रस्ताव रशिया स्वीकारणार की तिसऱ्या महायुद्धाची भीती सार्थ ठरणार?

Next Post
zelenski

युक्रेनचा चर्चेचा प्रस्ताव रशिया स्वीकारणार की तिसऱ्या महायुद्धाची भीती सार्थ ठरणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!