दक्षिण पश्चिम रेल्वेने १ हजार चार अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज मागवले आहेत. दहावी उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ९ जानेवारी २०२१ पर्यंत सुरू राहणार आहे. निवडलेल्या उमेदवाराचा प्रशिक्षण कालावधी एक वर्षाचा असेल.
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार अधिकृत वेबसाइट www.rrchubli.in वर अर्ज करू शकतात. दहावीत उमेदवाराच्या एकूण गुणांपैकी कमीत कमी ५० टक्के गुण असावेत. या व्यतिरिक्त उमेदवारांकडे एनसीव्हीटीचे राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र तसेच, संबंधित व्यावसायिक कौशल्याचा आयटीआय डिप्लोमा देखील असावा.
सदर पदांसाठी वयोमर्यादा १५ ते २४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर अर्ज करण्याचे शुल्क १०० रुपये असेल. या पदांची निवड गुणवत्तेच्या आधारे होईल. दहावी आणि आयटीआयचे गुण समाविष्ट करुन गुणवत्ता तयार केली जाईल आणि त्यानुसार उमेदवारांची निवड केली जाईल.