Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पिसाटांनी छळलं तरी दक्षिण कोरियन युट्यूबरचा भारतीय चांगुलपणा दाखवत राहण्याचा निर्धार!

December 8, 2022
in featured, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
South Korean YouTuber

मुक्तपीठ टीम

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या खार विभागात काही तरूणांनी दक्षिण कोरियन महिला युट्यूबरचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दोघेही बराच वेळ तिच्या मागे लागले. याचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. पण त्या महिला युट्यूबरने प्रचंड धैर्य दाखवले आणि ती या घटनेमुळे अजिबात खचली नाही. असे होऊनही ती भारतीय चांगुलपणा दाखवत राहील असे तिने म्हटले आहे. या प्रकरणी पोलिसांनी मोबीन चांद मोहम्मद शेख आणि मोहम्मद नकीब सदरियालम अन्सारी या तरुणांना अटक केली आहे.

तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे आणि भरभरून लाईक्सही मिळत आहे. विनयभंगाच्या घटनेनंतरही ती जगाला अद्भूत भारत दाखवत राहील असे तिने सांगितले.

महिला यूट्यूबरने मुंबई पोलिसांच्या जलद कारवाईचे केले कौतुक!

  • दक्षिण कोरियाच्या महिला युट्युबरने तिच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितले की, मुंबई पोलिसांनी ज्या प्रकारे त्वरीत कारवाई केली आणि छेडछाड करणाऱ्या मुलांना अटक केली, ही खूप मोठी गोष्ट आहे.
  • अशाप्रकारे पोलिसांची तत्परता इतर कोणत्याही देशात दिसत नाही.
  • तिने सांगितले की, ती गेले तीन आठवडे मुंबईत राहात आहे आणि इथे बराच काळ राहण्याचा विचार करत आहे.

पीडित महिलेने ट्विट केले की, “काल रात्री लाइव्ह स्ट्रीमिंगवेळी एका तरुणाने माझा छळ केला. प्रकरण वाढू नये म्हणून मी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि तो त्याच्या मित्रासोबत होता म्हणून निघून गेला. काही लोक म्हणाले की, मी खूप मैत्रीपूर्ण झाल्यामुळे आणि त्यांच्याशी बोलल्यामुळे असे झाले. या घटनेने मला स्ट्रीमिंगबद्दल पुन्हा विचार करण्यास भाग पाडले आहे.”

काय आहे प्रकरण? जाणून घ्या…

  • मुंबईच्या खार विभागात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दक्षिण कोरियाची महिला युट्यूबर लाइव्हस्ट्रीमिंग करत होती.
  •  या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
  • व्हिडीओमध्ये दिसत आहे की, एक तरुण त्याच्या मित्रासह महिलेच्या अगदी जवळ आला आणि तिने विरोध करूनही महिलेचा हात धरून तिला आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न केला.
  • महिला घटनास्थळावरून निघून जाऊ लागली तेव्हा तो तिचा मोटारसायकलवरून पाठलाग करू लागला.
  • महिलेला तिच्या घरी सोडतो असे म्हणाला महिलेने त्याची ऑफर नाकारली.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून मुंबई पोलिसांनी दोन्ही मुलांना अटक केली.

Tags: good newsKhar Roadmuktpeethmumbaimumbai policerapeSouth Korean YouTuberखार रोडघडलं-बिघडलंचांगली बातमीदक्षिण कोरियन युट्यूबरमुक्तपीठमुंबईमुंबई पोलीसविनयभंग
Previous Post

भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन: का साजरा केला जातो आणि त्यामागील इतिहास काय?

Next Post

एका ग्रामीण मुलाने बनवली ६ सीटर स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक! आनंद महिंद्रांनी केले कौतुक!

Next Post
6 Seater Swadeshi Electric Bike

एका ग्रामीण मुलाने बनवली ६ सीटर स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक! आनंद महिंद्रांनी केले कौतुक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!