Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एका ग्रामीण मुलाने बनवली ६ सीटर स्वदेशी इलेक्ट्रिक बाईक! आनंद महिंद्रांनी केले कौतुक!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
6 Seater Swadeshi Electric Bike

मुक्तपीठ टीम

ज्येष्ठ उद्योगपती आणि महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी काही दिवसांपूर्वी एका साध्या खेड्यातील मुलाच्या स्वदेशी शोधाचे कौतुक केले. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक गावातील मुलगा ६ सीटर इलेक्ट्रिक बाइक चालवताना दिसत आहे, जी त्याने स्वतः बनवली आहे. आनंद महिंद्रा यांनी हा व्हायरल व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून या गावातील मुलाने केलेल्या नाविन्याचे आणि त्याच्या देसी जुगाडचे कौतुक केले आहे.

एका चार्जवर १५० किलोमीटर धावणार…

  • या व्हायरल व्हिडिओमध्ये एक गावातील मुलगा त्याच्या हाताने बनवलेल्या 6 सीटर इलेक्ट्रिक बाईकची माहिती शेअर करताना दिसत आहे.
  • ३० सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगा म्हणतो, ‘मी ही ६ सीटची इलेक्ट्रिक बाईक बनवली आहे.
  • या बाईकवर ड्रायव्हरसह ६ प्रवासी एकाच वेळी बसू शकतात.
  • ही बाईक मी १० ते १२ हजार रुपये खर्चून बनवली आहे.
  • एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बाईक १५० किलोमीटरपर्यंत चालवता येते.
  • पूर्णपणे चार्ज होण्यासाठी फक्त ८ ते १० रुपये खर्च करावे लागतात.

ही बाईक जागतिक पातळीवर आणता येईल : आनंद महिंद्रा

  • आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडिओ शेअर केला आणि त्यांच्या कंपनीचे मुख्य डिझायनर प्रताप बोस यांना टॅग केले.
  • त्यांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘डिझाईनमध्ये किरकोळ बदल केल्यानंतर ही बाईक जागतिक स्तरावर आणली जाऊ शकते.’
  • ही बाईक युरोपातील गर्दीच्या पर्यटन केंद्रांमध्ये टूर ‘बस’ म्हणून वापरली जाऊ शकते का?
  • मी नेहमीच ग्रामीण वाहतूक कल्पकतेचा चाहता आहे, जिथे गरज ही शोधाची जननी आहे.
  • सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून अनेक युजर्स कमेंट करत आहेत.
  • या ग्रामीण मुलाचे आणि त्याच्या कल्पकतेचे कौतुक करत आहेत.

Tags: 6 Seater Swadeshi Electric Bike६ सीटर स्वदेशी इलेक्ट्रिक बाईकgood newsMahindra & Mahindra Companymuktpeethघडलं-बिघडलंचांगली बातमीमहिंद्रा अँड महिंद्रा कंपनीमुक्तपीठ
Previous Post

पिसाटांनी छळलं तरी दक्षिण कोरियन युट्यूबरचा भारतीय चांगुलपणा दाखवत राहण्याचा निर्धार!

Next Post

अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज!

Next Post
Maulana Azad Corporation

अल्पसंख्याक विद्यार्थी, महिला, बेरोजगारांसाठी मौलाना आझाद महामंडळामार्फत ३० लाख रुपयांपर्यंत कर्ज!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!