मुक्तपीठ टीम
देशभरात गेल्या वर्षभरापासून कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोना विषाणूची लागण रोखण्यासाठी गेल्या वर्षी राबविण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी पोहोचवण्यास मदत करणारा अभिनेता सोनू सूद यांना ‘स्पाइसजेट’ या विमान कंपनीने अनोख्या पद्धतीने गौरविले आहे. त्याचा एका वेगळ्याच पद्धतीने सन्मान केला आहे. कंपनीने एका विमानावर त्याचे छायाचित्र झळकवलं आहे.
कोरोनाच्या साथीमुळे देशाबाहेर आणि अडकलेल्या लोकांना त्यांच्या घरी नेण्यात या अभिनेत्याच्या भूमिकेचा सन्मान करण्याच्या उद्देशाने एअरलाइन्सने त्याचा फोटो विमानावर लावला आहे. बोईंग ७३७ या विमानावर त्याचा फोटो लावला आहे. अशी माहिती मिळाली आहे.
एअरलाइन्सने त्याला सिनेमासृष्टीतला हीरोपासून ते वास्तविक जीवनातला हीरो म्हणून त्याचे नाव रिअल-लाइफ सुपर हीरो असे ठेवले आहे. स्पाइसजेटने सांगितले की, “महामारीच्या सुरूवातीच्या काळात अडकलेल्या लोकांना देशात आणण्यासाठी एअरलाइन्स आणि अभिनेता सोनू सूद एकत्र आले होते आणि यासाठी एकत्र काम करीत होते.”
‘सोनू सूद यांना सलाम’ असा फोटोसह संदेश लिहिलेला आहे. विशेष म्हणजे असा विशेष सन्मान मिळवणारा सोनू हा पहिला भारतीय अभिनेता आहे. या कामगिरीबद्दल सोनूने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सामायिक करुन आनंद व्यक्त केला. सोनूच्या कर्तृत्वाबद्दल त्याला फिल्म इंडस्ट्रीकडून शुभेच्छासुद्धा मिळत आहेत. अभिनेत्री काजल अग्रवाल हीने देखील बोइंग ७३७ विमानाचा फोटो शेअर करुन सोनूचे अभिनंदन केले.
पाहा व्हिडीओ: