मुक्तपीठ टीम
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टॉमेटो सॉस आरोपाला उत्तर देताना किरीट सोमय्यांनी शिवसेनेवर प्रतिहल्ला केला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेनं खार पोलीस स्थानकाच्या हद्दीत माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला. सगळं लाइव्ह दाखवण्यात आलं आहे.
सोमय्यांच्या हत्त्येच्या प्रयत्नांचा आरोप!
- उद्धव ठाकरेंच्या माफिया सेनेनं खार पोलीस स्थानकाच्या हद्दीत माझी हत्या करण्याचा प्रयत्न केला.
- सगळं लाइव्ह दाखवण्यात आलं आहे.
- माझी तिसऱ्यांदा हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला, कारण माफिया सेनेचे जितके काही छोटे-मोठे सरदार आहेत सगळ्यांचे घोटाळे बाहेर आले.
- अनेकांच्या मालमत्ता जप्त झाल्या. अनेकांना अटक झाली, अनेक तुरुंगात आहेत, अनेक रुग्णालयात आहेत. अनेक जामीनावर आहेत.
- ठाकरे सरकार कापायला लागलीय.
- मनसुख हिरेननंतर किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा प्रयत्न झाला.
- पण माझ्या पाठीशी महाराष्ट्राच्या साडेबारा कोटी जनतेचं प्रेम आहे. माझे केसही वाकडे होणार नाही.
हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे
सोमय्या म्हणाले की राज्यपालांना भेटणार, केंद्रीय गृहसचिवांना ठाकरे सरकारने कारवाई नाही केली, याबद्दल अधिक माहिती पुरवू.
किरीट सोमय्यांची हत्या करण्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कमांडो, सरकारी कर्माचाऱ्याला माजी महापौरांनी मारहाण केलीय.
गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस स्थानकाच्या आवारात गुंडगिरी गुन्हा दाखल झाला पाहिजे.
हे सर्व सेक्शन उद्धव ठाकरे सरकारने नाही लावले तर आम्ही न्यायालयात जाणार.
खऱ्या गुन्ह्याची नोंद नाही!
- सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसैनिकांना अटक करुन जामीन मिळाला, ती कारवाई ही बनवाबनवी असल्याचा आरोप सोमय्यांनी केला.
- शिवसैनिकांनी सुरक्षारक्षकांना मारलं. किरीट सोमय्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला ते सर्व सेक्शन लावावे लागणार, अशी मागणी त्यांनी केली.