मुक्तपीठ टीम
केंद्र व राज्य शासनाच्या निर्णयानुसार ‘महाकृषी ऊर्जा अभियान’ अंतर्गत प्रधानमंत्री कुसुम-ब योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार सौर शेतीपंपांसाठी https://www.mahaurja.com या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन महाऊर्जाच्यावतीने करण्यात आले आहे.
प्रधानमंत्री कुसुम-ब योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांना 3 एच.पी., 5 एच.पी. व 7.5 एच.पी. क्षमतेच्या सौर शेतीपंपांसाठी अर्ज करता येतील. ही योजना केवळ जेथे वीज जोडणी पोहचलेली नाही त्यांच्यासाठीच आहे. खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 90 टक्के व अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी 95 टक्के अनुदानावर सौर शेतीपंप उपलब्ध होतील. योजनेचा लाभ घेण्यासाठी महाऊर्जाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर सौर शेतीपंपाचा लाभ देण्यात येईल.
पाहा व्हिडीओ:
रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र