Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक गाव एक गणपतीचा आदर्श वसा ४९ वर्षे जपणारे आदर्श गाव

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
ganeshotsav

गौरव संतोष पाटील

डहाणू तालुक्यातील कुणबी व आदिवासी समाजाची लोकवस्ती असलेले डोंगराच्या कुशीत आणि सूर्या नदीच्या तिरावर वसलेले निसर्गरम्य “उर्सें ” गाव ह्या गावाने “एक गांव एक उत्सवाच्या” माध्यमातून जनते समोर एक आदर्श उभा केला आहे. गणेशोत्सव म्हटलं की, जिथं नजर जाईल तिथं बाप्पांचं दर्शन घडतं. मग गावागावांत असो पाड्यापाड्यांत असो किंवा गल्लोगल्ली असो. जिथं- तिथं घरोघरी आणि सार्वजनिक मंडळांचे गणपती दिसून येतात. त्यात आता कोरोनाचं सावट. तरी या कोरोना च्या सावटाखाली पालघर जिल्ह्यात घरोघरी दीड, अडीच आणि पाच दिवसांचा तर सार्वजनिक गणेश मंडळामध्ये पाच, सात आणि अकरा दिवसांसाठी बाप्पांची स्थापना झाली. मात्र एक गाव एक गणपती सारखी संकल्पना क्वचितचं ठिकाणी दिसून येते. अशीच एक गाव एक गणपती ची संकल्पना पालघर जिल्ह्यातल्या एका गावानं गेल्या 49 वर्षांपासून अविरतपणे सुरू ठेवली आहे.

ganeshotsav

गेल्या ४९ वर्ष्यापासून उर्से गावातील सर्व समाजाचे महिला, पुरुष व अबालवृद्ध एकत्र येवून सार्वजनिक गणेशोस्तव ,सार्वजनिक गौरी उस्तव ,नवरात्रोउत्सव ,गोपाळकाला यासह सर्व सण अखंड एकत्र एवून आनंदाने साजरे करत आहेत.यंदाचे ४९ वे वर्ष असून ह्या गावाची लोकसंख्या २५०० च्या आसपास आहे.

ganeshotsav

दर वर्षी गणपती व गौरी उत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे व खेळांचे आयोजन केले जाते.ह्या गावाला आध्यात्मिक परिवाराची शिकवण आहे हाच आदर्श ह्या गावान जोपासला आहे.कोणत्याही घरी घरगुती गणपती बसविला जात नाही.म्हणून संपूर्ण गाव एकाच ठिकाणी एकत्र येउन सर्व उत्सव साजरे करतात.मात्र जगावर आलेल्या कोरोना संकटामुळे या सर्व कार्यक्रमास स्थगिती गावकऱ्यांनी दिली असून यंदाही अगदी साधे पणाने बाप्पाला विराजमान करून कोरोनाचे सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले,,,विशेष म्हणजे गावातील तरुण एकत्र येवून डेकोरेशन आणि आरास तयार करत असतात,येथे बनविण्यात येणारा आरासही इको फ्रेंडली असतो,,ह्या वर्षी कोरोना योध्ये आणि कोरोनवर मात करणारा देखावा तयार करून बाप्पाना विराजमान केलं आहे.

ganeshotsav

विशेष म्हणजे ह्या गावामध्ये तीन मंडळे कार्यरत असून कोणत्याही प्रकारची देणगी गावाच्या बाहेरून स्वीकारली जात नसून सर्व आर्थिक बाब हि गावकरीच गोळा करतात .या गावाने एक आपले स्वतःचे भव्य सभागृह कोणतीही देणगी न घेता उभे केले आहे गावाचे सर्व गावकरी येथेच आपले सर्व सण एकत्र साजरे करतात . तर सर्व काम ही श्रमदनातून केली जातात.ह्या गावाची परंपरा अशी कि गणपती व गौरी विसर्जना नंतर शिल्लक राहिलेल्या सर्व वस्तूंचा लिलाव केला जातो व भगवंता वरचा भाव म्हणून गावकरी सर्व वस्तू चढ्या भावाने आनंदाने खरेदी करतात.ह्या मधून उरलेले पैसे गरजवंत गाव शेतकरयांना व्याजाने वाटप केले जातात .व पुढील वर्षी ह्याच पैश्यातून हे सण साजरे करतात .दर वर्षी नवीन मंडळाचे पदाधिकारी बिनविरोध निवडले जातात.

ह्या ठिकाणी जुगार व नश्या यांना पूर्णपणे विरोध असतो व असे करणारास दंड आकारला जातो ,येथे कोणताही पोलिस बंदोबस्त बोलाविला जात नाही .अशा प्रतिक्रिया उर्से गांवकरी व्यक्त करतात तर याच सामाजिक भावनेतून संघटित व्हावे हा एकतेचा सामाजिक संदेश ह्या माध्यमातून उर्से गावाने जनतेला देण्याचा प्रयत्न केलाय

 

पाहा व्हिडीओ:
रोहिणी ठोंबरेचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र


Tags: ganeshotsavmuktpeethPalgharउर्से गावएक गांव एक गणपतीगणेशोत्सवडहाणूमुक्तपीठ
Previous Post

राज्यात ३,५३० नवे रुग्ण, ३,६८५ रुग्ण बरे! मुंबईत सतत चौथ्या दिवशी चारशेपेक्षा कमी नवे रुग्ण!!

Next Post

शेतकऱ्यांसाठी सौर शेतीपंप, प्रधानमंत्री कुसुम योजनेत अर्जासाठी आवाहन

Next Post
solar pump

शेतकऱ्यांसाठी सौर शेतीपंप, प्रधानमंत्री कुसुम योजनेत अर्जासाठी आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!