मुक्तपीठ टीम
स्मार्टफोन कंपनी इंफिनिक्स लवकरच १६० वॉट फास्ट चार्जिंगचा हँडसेट लॉन्च करत आहे. एक्सडीए डेव्हलपर्सने या नवीन स्मार्टफोनसाठी १६० वॉट चार्जरचा एक फोटो या महिन्याच्या सुरुवातीस शेअर केला होता. आता एक्सडीए डेव्हलपर्सने इंफिनिक्सच्या एका मिस्ट्री फोनचा फोटो शेअर केला आहे. प्रत्येक स्मार्ट यूजरला आवश्यक वाटणारे, झटपट चार्जिंगची गरज भागवणारे तंत्रज्ञान या स्मार्टफोनमध्ये आहे. हा स्मार्टफोन चार्जिंगच्याबाबतीत सुपर स्मार्ट आहे…तो अवघ्या दहा मिनिटात पूर्ण चार्ज होतो, असा दावा इंफिनिक्सने केला आहे.
असे म्हटले जात आहे की, कंपनी हा स्मार्टफोन १६० वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह लॉन्च करणार आहे. २१ जून रोजी कंपनीने या मिस्ट्री फोनचा पहिला टीझर जाहीर केला आहे. कंपनीचा हा फोन ब्लेझिंग फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येईल.
That’s right. 160W charging! ⚡#Infinix pic.twitter.com/IlgMNaC9M3
— InfinixIndia (@InfinixIndia) June 21, 2021
फ्लॅगशिप डिव्हाइसमध्ये १२० वॉट पर्यंतची चार्जिंग
• सध्या बाजारात असे काही फ्लॅगशिप स्मार्टफोन आहेत जे १२० वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.
• हे चार्जिंग तंत्रज्ञान उद्योगातील सर्वात वेगवान चार्जिंग असल्याचे म्हटले जाते.
• १२० वॉट फास्ट चार्जिंग १५ मिनिटांत ४००० एमएएच बॅटरी चार्ज करते.
• आतापर्यंत, चीनशिवाय इतर कोणत्याही देशात १२० वॉट फास्ट चार्जिंगचा स्मार्टफोन उपलब्ध नाही.
इंफिनिक्स स्मार्टफोनचे फीचर्स
• १० मिनिटांत फोनची बॅटरी पूर्णपणे चार्ज होणार.
• येत्या काही दिवसांत कंपनी या चार्जिंग तंत्रज्ञानाविषयी आणखी काही माहिती शेअर करेल.
• स्मार्टफोनचा टीझर पाहता, हा फोन कर्व्ह एज डिसप्लेसह असल्याचे दिसत आहे.
• हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज आहे.
• फोनच्या मागील बाजूस एक मोठा लेन्स देण्यात आला आहे.
• याशिवाय फोनमध्ये व्हॉल्यूम रॉकर बटन, पॉवर की, स्पीकर ग्रिल, यूएसबी पोर्ट आणि एज सीमकार्ड ट्रे दिला गेला आहे.
• हा स्मार्टफोन हाय-एन्ड फ्लॅगशिप डिव्हाइसच्या कॅटेगरीमधून लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे.