Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारताची स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत लवकरच सज्ज

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
INS vikrant

मुक्तपीठ टीम

भारताचे स्वदेशी विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत २०२२ वर्षाच्या सुरुवातीला तयार होईल अशी शक्यता आहे. पुढच्या काही महिन्यांत विक्रांतच्या समुद्री चाचण्या सुरू होणार आहेत. कोची शिपयार्ड आणि भारतीय नौदलाच्या उच्च अधिकाऱ्यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

 

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाच्या कोची आणि कोची शिपयार्ड येथील दक्षिणी कमान येथे दोन दिवसांच्या भेटीत स्वदेशी विमान वाहक युद्धनौका विक्रांतच्या बांधकाम कामाचा आढावा घेतला. या वेळी त्यांच्यासमवेत नौदलाचे प्रमुख अ‍ॅडमिरल करमबीर सिंह आणि दक्षिणी कमानचे कमांडर, व्हाइस अॅडमिरल ए.के. चावला उपस्थित होते.

 

Raksha Mantri Shri @rajnathsingh will review the progress of construction of the Indigenous Aircraft Carrier (IAC) in Kochi today. pic.twitter.com/mbQs0CorZj

— रक्षा मंत्री कार्यालय/ RMO India (@DefenceMinIndia) June 25, 2021

 

आयएनएस विक्रांत समुद्रातील प्रभावी शस्त्र

• जेव्हा आयएनएस विक्रांत पूर्णपणे तयार होईल, तेव्हा ते नौसेनेचे समुद्रातील सर्वात प्रभावी आणि घातक शस्त्र असल्याचे सिद्ध होईल.
• मिग-२९के लढाऊ विमान
• कामोव हेलिकॉप्टर
• अॅन्टी-सबमरीन हेलिकॉप्टर
• एमएच-६०आर
• स्वदेशी अॅडव्हान्स लाइट हेलिकॉप्टर्स विक्रांतवर तैनात असतील.

 

आयएनएस विक्रांत लांब पल्ल्यातील हवाई कामगिरीसाठीही उपयोगी ठरेल. ज्यामध्ये एअर इंटरडिक्शन, अॅन्टी-सर्फेस वॉरफेअर, आक्रमक आणि बचावात्मक काउंटर-एअर, एअरबोर्न अॅन्टी-सबमरीन वॉरफेअर आणि एअरबोर्न अर्ली वॉर्निंगचा समावेश आहे. संरक्षणमंत्री म्हणाले की, “गेल्या वर्षी एलएसीवर चीनबरोबर झालेल्या गॅलवान व्हॅली हिंसाचाराच्या वेळी, भारतीय नौदलाने स्पष्टपणे सांगितले होते की, भारताला शांतता हवी आहे, परंतु तरीही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास भारत तयार आहे.”

 

संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा एकदा सांगितले की, येत्या काळात भारतीय नौदल जगातील तिसऱ्या क्रमांकाची नौदल बनेल. सध्या भारतीय नौदलाच्या ४२ युद्धनौका वेगवेगळ्या शिपयार्डमध्ये तयार होत आहेत, त्यापैकी ४० युद्धनौका भारतातच बांधल्या जात आहेत.


Tags: Defense Minister Rajnath Singhभारतीय नौदलशिपयार्डसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह
Previous Post

कोरोनाच्या प्रत्येक व्हेरिएंटशी लढण्यासाठी लवकरच ‘सुपर वॅक्सिन’

Next Post

अवघ्या १० मिनिटांत फुल चार्ज होणारा पहिला स्मार्टफोन!

Next Post
smartphone

अवघ्या १० मिनिटांत फुल चार्ज होणारा पहिला स्मार्टफोन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!