मुक्तपीठ टीम
‘कांतारा’ चित्रपटगृहांमध्ये जबरदस्त हीट होताना दिसत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली आहे. अभिनेता ऋषभ शेट्टी याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून त्याने या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. तो सतत चर्चेत असतो. कन्नड आणि हिंदी व्हर्जनमध्ये लाखो लोकांची मने जिंकल्यानंतर, त्याच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्येही दररोज वाढ होत आहे. तर दुसरीकडे ऋषभ शेट्टीने बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांना एक खास सल्ला दिला आहे. तो म्हणतो की, “जर चांगला सिनेमा बनवायचा असेल तर त्याच्या मुळाशी राहा आणि पाश्चात्य संस्कृतीच्या संवेदनशीलतेने प्रभावित होऊ नका.”
बॉलिवूड चित्रपट निर्मात्यांसाठी ऋषभ शेट्टीचा चांगला सल्ला!
- ऋषभ शेट्टीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘कांतारा’वर बोलत बॉलिवूडमध्ये कुठे चुकत आहे हे सांगितले.
- दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीप्रमाणे बॉलिवूड यश मिळवण्यात अपयशी ठरवत आहेत. कांताराच्या यशाचे श्रेय ऋषभने त्याच्या पॅकेजिंगला दिले आहे.
- बॉलीवूडवर “पाश्चिमात्य संस्कृती” चा खूप प्रभाव आहे.
- पश्चिमात्य प्रभाव आणि हॉलीवूड आणि इतर कंटेंटचा जास्त वापर यामुळे चित्रपट निर्मात्यांनी भारतात हे करण्याचा प्रयत्न केला आहे.
- हॉलीवूडमधील लोक आधीच हे करत आहेत आणि ते त्या दृष्टीने चांगले करत आहेत. यामुळे तुम्ही यावर अधिक प्रभावित होऊ नका.
काय म्हणाला ऋषभ शेट्टी?
ऋषभ शेट्टी म्हणतो की, “वैयक्तिक उपभोगासाठी नव्हे तर प्रेक्षकांचे हित लक्षात घेऊन चित्रपट बनवले पाहिजेत. हा दृष्टीकोन बॉलीवूड चित्रपट निर्माते आजकाल विसरत चालले आहेत. आम्ही प्रेक्षकांसाठी चित्रपट बनवतो, आमच्यासाठी नाही. आम्हाला ते आणि त्यांच्या भावना लक्षात ठेवल्या पाहिजेत.”
‘कांतारा’ हा दुसरा सर्वात मोठा कन्नड चित्रपट!
- ब्लॉकबस्टर म्हणून उदयास आलेल्या कांताराच्या हिंदी व्हर्जनने आतापर्यंत ५४ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
- केजीएफ: चॅप्टर २नंतर हा दुसरा सर्वात मोठा कन्नड चित्रपट बनला आहे.
- त्याचे यश एका वर्षात आले आहे जिथे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर संघर्ष करत आहेत. कांतारा विक्रम करत आहे.