Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरच्या वापरापासून दूर ठेवणार स्लीप एपनिया मास्क!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mask

मुक्तपीठ टीम

कोरोनाने जवळजवळ दोन वर्ष जगभरात थैमान घातले आहे. सध्या याचे प्रमाण थंडावताना दिसत आहे. परंतु, कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजनच्या अभावामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, ब्रिटनमध्ये नुकतेच झालेले संशोधन कोरोनाबाधितांचे प्राण वाचवण्यासाठी खूपच उपयोगी ठरू शकते. या संशोधनानुसार, स्लीप एपनिया मास्क कोरोना रुग्णांना व्हेंटिलेटरच्या वापरापासून वाचवू शकेल.

 

सीपीएपी मशीन कोरोना रूग्णांना ठेवणार व्हेंटिलेटरच्या वापरापासून दूर

वॉर्विक विद्यापीठ आणि क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्टच्या संशोधकांना असे आढळले आहे की, एपनिया मास्क म्हणजेच सतत पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर (सीपीएपी) मशीन काही गंभीर आजारी रुग्णांना व्हेंटिलेटरवर जाण्यापासून वाचवू शकतात. या थेरपीमध्ये, फुफ्फुसांमध्ये हवा पंप केली जाते जेणेकरून वरचा एअरवे कोसळू नये. म्हणजेच, ते श्वसनमार्गाचा वरचा भाग निष्क्रिय होण्यापासून प्रतिबंधित करते आणि फुफ्फुसांना दाबाने हवा पाठवते.

 

सीपीएपी थेरपी घेणाऱ्यांमध्ये मृत्यूचा आकडा कमी

  • सीपीएपी थेरपी घेणाऱ्या लोकांमध्ये, व्हेंटिलेटरवर गेलेल्या किंवा ३० दिवसांच्या आत मरण पावलेल्या लोकांची संख्या मोठ्याप्रमाणात कमी आहे.
  • सीपीएपी थेरपी घेणाऱ्या ३७७ लोकांपैकी २४० लोकांना म्हणजेच ६३% लोकांना व्हेंटिलेटरची गरज नव्हती.

आयसीयूमध्ये दाखल सीपीएपी थेरपी घेतलेल्या १२ पैकी केवळ १ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता

  • सीपीएपी थेरपी हा कोरोना रुग्णांसाठी अधिक चांगला पर्याय असू शकतो.
  • ज्यांना अधिक ऑक्सिजनची आवश्यकता असते, त्यांना सीपीएपी थेरपी हा उत्तम पर्याय ठरू शकतो.

 

एपनिया मास्क भारतासाठी एक चांगला पर्याय

  • एपनिया मास्क भारतासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.
  • इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर नुसार, एक वर्षापूर्वी, देशात १३६.६४ कोटी लोकसंख्या असलेल्यांना सुमारे ४० हजार व्हेंटिलेटर उपलब्ध होते.
  • केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ.भारती प्रवीण पवार यांच्या माहितीनुसार, देशात सध्या ५७,५१८ व्हेंटिलेटर आहेत.
  • त्यापैकी अनेक लोकांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरच्या अभावामुळे आपला जीव गमवावा लागला आहे.
  • अशा परिस्थितीत भारतातील लोकांसाठी एपनिया मास्क हा एक चांगला पर्याय असू शकतो.
  • कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ही थेरपी खूप मदत करते.
  • सीपीएपी मशीनचा कंप्रेसर दाबलेल्या हवेचा सतत प्रवाह तयार करतो.
  • एअर फिल्टरद्वारे ट्यूबद्वारे शुद्ध केलेली हवा रुग्णांच्या नाकाजवळ किंवा तोंडाजवळ मास्कपर्यंत पोहोचते.

 

कोरोना महामारी काळात या मशीनचे महत्त्व वाढले आहे. हा उपचार संसर्गाच्या सुरुवातीच्या काळात उपयोगी पडतो आणि फुफ्फुसांचे संरक्षण करतो. सीपीएपी मास्क स्लीप एपनिया असलेल्या रुग्णांसाठी तयार करण्यात आला होता. स्लीप एपनिया ग्रस्त लोकांसाठी डिझाइन केले गेले होते, जे त्यांना झोपेत श्वास घेण्यास मदत करते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: coronaCPAP maskऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरकोरोनासीपीएपी मास्क
Previous Post

हलाखीतून शिकला, भाल्यासारखाच झेपावला…आता नीरजवर अष्टदिशातून सुवर्ण वर्षाव!

Next Post

मुंबईच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात नोकरीची संधी

Next Post
SCI

मुंबईच्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!