Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घरचा पीसी, लॅपटॉप स्लो झाला? फास्ट करण्यासाठी या घ्या सोप्या टीप्स…

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
laptop pc

मुक्तपीठ टीम

आजच्या काळात पीसी किंवा लॅपटॉप न वापरणारे लोक फार कमी भेटतील. पीसी विद्यार्थ्यांना कोणत्याही वेळी, कोठेही शैक्षणिक असाइनमेंटवर काम करण्यासाठी आवश्यक लवचिकता आणि स्वातंत्र्य देतो. कुठेही असलो तरी लॅपटॉप आपल्याला आपले काम आपल्यासोबत आणण्याची परवानगी देतो. अभ्यासासाठी, ऑफिस कामासाठी, वैयक्तिक वापरासाठी पीसी आणि लॅपटॉपचा वापर होतो. पीसी किंवा लॅपटॉपची गती कमी होण्याची समस्या सर्वांनाच भेडसावते.

 

समस्या माहित असते, पण कशी सोडवायची ते कळत नाही. जुन्या संगणकांमध्ये ही समस्या जरा जास्तच सतावते. कोणतेही काम करताना त्रास होतो. ही समस्या पीसी किंवा लॅपटॉपमध्ये कधी ना कधी उद्भवते. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी अगदी सोप्या टीप्स जाणून घेऊया.

 

रीसायकल बिन करा रिकामा!

  • पीसी आणि लॅपटॉपचा रीसायकल बिन भरतो तेव्हा त्यांची गती कमी होते. वेळोवेळी ते रिकामे ठेवणे महत्वाचे आहे.
  • या व्यतिरिक्त, फाईल महत्वाची नसेल तर ती Shift + Delete सह हटवावी.
  • ती फाइल रीसायकलिंग बिनमध्ये न जाता कायमची हटवली जाईल.

 

डेस्कटॉपवर आणि सी ड्राइव्हमध्ये काही नको!

  • पीसी आणि लॅपटॉपच्या सी ड्राइव्हमध्ये फोटो किंवा व्हिडिओ टाकू नका, फक्त सेटअप आणि प्रोग्राम फाइल्स त्यात ठेवा.
  • अनेक लोक सी ड्राइव्हमध्ये अनेक फाईल्स सेव्हही करतात, ज्यामुळे संगणकाची गत कमी होण्याची समस्या निर्माण होते.

 

टेम्प आणि करप्ट फाइल हटवा!

  • संगणकावरून TEMP आणि करप्ट फाइल्स हटवा.
  • या साठी स्क्रिनच्या खालच्या भागातील डाव्या कोपऱ्यातील सर्चमध्ये RUN टाइप करा.
  • उघडलेल्या रनच्या विन्डोत %temp% टाइप करा आणि एंटर बटण दाबा.
  • तात्पुरत्या फायलींची यादी समोर उघडेल, जी निवडून हटवू शकता.
  • आठवड्यातून दोन ते तीन वेळा TEMP फाइल हटवा.

Tags: computerlaptoplatest takemuktpeethकॉम्प्युटरमुक्तपीठलॅपटॉपलेटेस्ट टेक
Previous Post

भारत कन्या अंजली शर्मा यांनी ऑस्ट्रेलियात जिंकली कोळसा खाणींविरोधातील पर्यावरणाची लढाई

Next Post

बालविवाह झालेल्या मुलीचा बाळंतपणात मृत्यू : रुपालीताई चाकणकर पहिली भेट या गावाला द्या

Next Post
herambhaa kulkari and ruplai chakhankar

बालविवाह झालेल्या मुलीचा बाळंतपणात मृत्यू : रुपालीताई चाकणकर पहिली भेट या गावाला द्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!