मुक्तपीठ टीम
ट्रूकॉलरच्या धोक्यांकडे अनेकदा लक्ष वेधले जाते. तरीही कोट्यवधी ते वापरतात. आपल्याला कोण कॉल करत आहे किंवा कोण मॅसेज करत आहे, हे जाणून घेण्यासाठी तसे केले जाते. एखादा कॉल स्वीकारणे किंवा कट करणे हे ठरवण्यासाठीही ते उपयोगी ठरते. त्याचबरोबर इतरही काही फायदे आहेत. पण अनेकदा तुम्हाला कळत असेल की तुमचे नाव भलतेच जात आहे. मित्र चेष्टाही करत असतील. ट्रू कॉलरने आता नावात बदल करण्याची सोय दिली आहे. तुम्ही ती वापरून नावात सुधारणा करु शकता.
ट्रूकॉलर वर नाव कसे बदलावे
- अँड्रॉइड किंवा आयओएस वर ट्रूकॉलर ॲप ओपन करा.
- मग वरती डाव्याबाजूला (आयओएस वर खाली उजव्या बाजूला) हैमबर्गर मेन्यू आयकॉन वर टॅप करा.
- तुमच्या नावाला आणि फोन नंबरला पुढे एडिट आयकॉन वर टॅप करा. (आयओएस प्रोफाइल एडिट करा).
- पहिल्या आणि शेवटच्या फील्ड मध्ये दिले गेलेलं नावाला एडिट करा.
ट्रूकॉलर वर आपले अकाउंट कसे डिलीट करावे
- अँड्रॉइड किंवा आयओएस वर ट्रूकॉलर ॲप ओपन करा.
- मग वरती डाव्याबाजूला (आयओएस वर खाली उजव्या बाजूला) हैमबर्गर मेन्यू आयकॉन वर टॅप करा.
- यानंतर सेटिंग वर टॅप करा.
- मग प्रायव्हसी सेंटर वर तावकरा.
- खाली स्क्रोल करा आणि तुम्हाला तिथे एक डीॲक्टिव चा ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.
- आयएसओ वर, तुम्हाला कीप माय डाटा आणि डिलीट माय डाटा चा ऑप्शन दिसेल.कीप माय डाटा तुम्हाला सर्चेबल बनवेल. पण तुम्ही ट्रूकॉलर वर कसे डिस्प्ले केले जात आहेत हे एडिट करता येणार नाही.
- डिलीट माय डाटा वर क्लिक करून तुम्ही तुमचे अकाउंट आणि डाटा डिलीट करू शकाल.