Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिरो मोटोकॉर्पने सुरू केले हार्ले डेव्हिडसन पॅन अमेरिका १२५० चे बुकिंग!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
hero

मुक्तपीठ टीम

हार्ले डेव्हिडसन म्हटलं की बाइक प्रेमींच्या मनात वेगळ्याच लहरी उमटतात. ह्रदयाची धडधड वाटते. हिरो मोटोकॉर्पने हार्ले डेव्हिडसन पॅन अमेरिका १२५० अॅडव्हेंचर टूरर बाईक्सच्या पुढील बॅचचे बुकिंग सुरू केले आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, आणखी १३ हार्ले मॉडेल्स आणि आगामी स्पोर्टस्टर एससाठी देखील बुकिंग सुरू करण्यात आले आहे. हार्ले-डेव्हिडसनने या वर्षी एप्रिलमध्ये २०२१ पॅन अमेरिका १२५० एडीव्ही ला १६ लाख ९० हजार रुपयांना लाँच केले होते.

 

हार्ले डेव्हिडसन पॅन अमेरिका १२५० ही बाईक स्टँडर्ड आणि स्पेशल अशा दोन प्रकारांमध्ये प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे.

  • ही बाईक स्टँडर्ड आणि स्पेशल अशा दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असणार आहे.
  • दोन्ही प्रकारांच्या बाईक्समध्ये उपलब्ध असलेल्या काही प्रमुख फीचर्समध्ये फुल-एलईडी लाइटिंग, ब्लूटूथ-इनेबल्ड ६.८ इंच रंग टीएफटी टचस्क्रीन डिस्प्ले आणि यूएसबी सी-टाइप आउटलेटचा समावेश आहे.
  • दोन्ही बाईक्स १२५२सीसी, रिव्हॉल्यूशन मॅक्स १२५० इंजिनसह येतात.
  • हे इंजीनमध्ये जास्तीत जास्त १५० बीएचपी आणि १२७ एनएम टॉर्क निर्माण करण्याची क्षमता आहे.
  • बाईकवरील ट्रान्समिशन पर्यायांमध्ये ६-स्पीड युनिटचा समावेश आहे.

 

लाँच झाल्यापासून, पॅन अमेरिका १२५० एडीव्ही ने उत्साही ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिरोच्या प्रीमियम सेगमेंट बिझनेसचे प्रमुख रवी अवलूर म्हणाले, “पॅन अमेरिका १२५० ही २०२१ च्या सर्वाधिक प्रतीक्षित मोटरसायकलींपैकी एक आहे. हार्ले-डेव्हिडसनची साहसी-टूरिंग सेगमेंटमधील पहिली चढाई मानून, मोटारसायकलने अगोदरच मोठी कमाई केली आहे. ग्राहकांमध्ये यासाठी उत्साह निर्माण झाला आहे.” असे ते म्हणाले.

 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतीय बाजारपेठेसाठी हार्ले-डेव्हिडसनसोबत भागीदारीची घोषणा केल्यानंतर, हिरो मोटोकॉर्प हार्ले मोटार सायकलींसाठी ग्राहक टच-पॉइंट आणि सेवा केंद्राचा विस्तार करत आहे. हिरो मोटोकॉर्पकडे आता संपूर्ण देशात १४ डीलरशिप आणि सात अधिकृत सेवा केंद्रे आहेत जे हार्ले-डेविडसन ग्राहकांसाठी आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: AmericaHarley-Davidsonhero motocorpअमेरिकाहार्ले डेव्हिडसनहिरो मोटोकॉर्प
Previous Post

ट्रेन उशिरा आल्याने विमान चुकले, प्रवाशाला रेल्वेकडून ३० हजारांची नुकसानभरपाई

Next Post

ट्रू कॉलरवर तुमचं नाव बदलायचं? अकाऊंट डिलीट करायचं? वाचा उपयोगी सोप्या टिप्स

Next Post
truecaller

ट्रू कॉलरवर तुमचं नाव बदलायचं? अकाऊंट डिलीट करायचं? वाचा उपयोगी सोप्या टिप्स

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!