मुक्तपीठ टीम
शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या रोहिणी न्यायालयात फिल्मी स्टाइल गोळीबार झाला. भर दुपारी न्यायालय परिसरात हजर करण्यात आलेला गँगस्टर जितेंद्र उर्फ गोगी याला गुंडांनी गोळ्या घालून ठार करण्यात आले. या गोळीबारात तिघांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीच्या उच्च सुरक्षा असलेल्या रोहिणी न्यायालयात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
या गोळीबारात गँगस्टर गोगी ठार झाला आहे. पोलिसांनीही बदमाशांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत दोघांना ठार केले. रोहिणी न्यायालयात दोन सशस्त्र बदमाश वकिलांच्या वेशात आले होते आणि यामुळे त्यांची ओळख पटू शकली नाही. असे म्हटले जात आहे की ही लोकं गँगस्टर गोगीला मारण्यासाठी आले होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गँगस्टर गोगीवर वकिलाचे कपडे घातलेल्या टिल्लू ताजपुरीया टोळीने हा हल्ला केला होता. जे दोन हल्लेखोर होते त्यामधील एकाचं नाव राहुल आहे, त्याच्यावर ५० हजार रूपयांचे बक्षिस घोषित केलेला आहे. या घटनेमुळे न्यायालयाची सुरक्षा, तपासाची प्रक्रियेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. न्यायालयाच्या आवारात अशा घटनेने एक भयानक वातावरण निर्माण केले आहे.
Multiple shots fired. Casualties in Rohini Court.
Gangwar inside court premises .
Mind it this in right in heart of Delhi #Rohini pic.twitter.com/BPVDlK5nXU— Sagar maurya (@Sagarma63229573) September 24, 2021
शूटआऊट अॅट दिल्ली कोर्ट!
- दिल्ली पोलीस रोहिणी न्यायालयात गँगस्टर जितेंद्र उर्फ ‘गोगी’ खटल्याच्या सुनावणीसाठी घेऊन आले होते.
- या दरम्यान वकिलाच्या वेशात आलेल्या दोन गुंडांनी गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला, त्यात दोन्ही गुंड ठार झाले.
- गोगीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तिथे त्याचा मृत्यू झाला.
- गोगीला २०२०मध्ये गुरुग्राम येथून अटक करण्यात आली होती.
- त्याला दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाने अटक केली होती, तेव्हापासून तो तिहार तुरुंगात होता.
- याच्यावर खून आणि दरोड्यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
- त्याला तिहार तुरुंगात ठेवण्यात आले होते, तिथून त्याला एका खटल्याच्या सुनावणीसाठी न्यायालयात आणण्यात आले होते.
- टिल्लू ताजपुरीया टोळीच्या दोन गुंडांनी त्याच्यावर गोळीबार केला.