Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराष्ट्राच्या राजकारणात नवा इतिहास : शिवसेना – संभाजी ब्रिगेड युती!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shivsena with sambhaji brigade

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेशी बंडखोरी केल्यानंतर महाराष्ट्रातील सत्तानाट्याला सुरुवात झाली. एकनाथ शिंदेंनी एकीकडे भाजपासोबत युती करत राज्यात सरकार स्थापन केलं. तर दुसरीकडे राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडने युती केली असून यापुढे हे दोन्ही पक्ष एकत्र काम करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे, पक्षाचे प्रवक्ते गंगाधर बनबरे तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई उपस्थित होते.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन मोठा इतिहास घडवेल, उद्धव ठाकरे

  • उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो.
  • केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे.
  • यालाच लोकशाही मानणारे लोकं आता बेतालपणे बोलत आहेत.
  • कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल.
  • आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत.
  • प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात.
  • संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू.

दुहीच्या शापाला गाडून टाकू!!

  • मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे.
  • आपली भूमिका रोखठोक आहे.
  • ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत.
  • आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे.
  • काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात.
  • ही आपली वैचारिक युती झाली आहे.
  • महाराष्ट्रात आज जे काही घडवलं किंवा बिघडवलं ती महाराष्ट्राची ओळख नाही.
  • शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत.
  • आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे.
  • आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू.
  • संभाजी ब्रिगेडसोबत मतभिन्नता किती आहे यापेक्षा मतऐक्य किती आहे हे महत्वाचं आहे.
  • दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु.
  • या एकीनं शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारी मंडळी आनंदी होईल.
  • संविधान टिकवण्यासाठी ही युती झाली आहे.

क्रांतीची गरज आहे, त्यामुळं आम्ही एकत्र आलो- मनोज आखरे

  • संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे म्हणाले की, एक चांगलं समीकरण शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं तयार होणार आहे.
  • संभाजी ब्रिगेड गेल्या ३० वर्षांपासून राज्यात काम करत आहे. राजसत्ता ही सर्वोच्च सत्ता आहे.
  • व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सत्तेत येणं गरजेचं आहे.
  • त्यामुळं आम्ही २०१६ रोजी संभाजी ब्रिगेड राजकीय पक्ष झाला.
  • आम्ही विधानसभा, लोकसभासह सर्व निवडणुका लढवणार आहोत, त्यासाठी आम्ही शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडनं एकत्र यायचं ठरवलं आहे.
  • देशात लोकशाही आणि संविधान धोक्यात आहे.
  • देशात विषमतावादी वातावरण झालं आहे.
  • आज क्रांतीची गरज आहे, त्यामुळं आम्ही एकत्र आलो आहोत.

Tags: Maharashtrasambhaji brigadeShivsenaUddhav Thackerayउद्धव ठाकरेमहाराष्ट्रशिवसेनासंभाजी ब्रिगेड
Previous Post

राज्यात ७५ हजार पदांवर भरती होणार

Next Post

गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून ‘स्वतंत्र’ झाले, भाजपात नाही…नवा पक्ष काढणार!

Next Post
Gulam Nabi Azad

गुलाम नबी आझाद काँग्रेसमधून 'स्वतंत्र' झाले, भाजपात नाही...नवा पक्ष काढणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!