मुक्तपीठ टीम
स्वातंत्र्यदिनी शिवसेनेनं ठाण्यात लहानग्यांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजित केलं आहे. ठाण्यामध्ये स्वातंत्र्यदिन आणि आमदार रविंद्र फाटक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या आरोग्य शिबिराचं आयोजनाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यात लहान मुलांच्या ह्रदयविकाराचे निदान आणि उपचार होणार आहेत. खासकरुन हृदयाला छिद्र असलेल्या लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी तसंच हृदय शस्त्रक्रियाही केली जाईल.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत १६ वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना, ज्युपिटर हॉस्पिटल ठाणे, शिवसेना वैद्यकी मदत कक्ष आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांकरीता या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे.
हेही वाचा: ह्रदयाला छिद्र असण्याचा विकार आहे तरी काय? कसा ओळखाल? इलाज काय?
शिबिराची वेळ, ठिकाण खालीलप्रमाणे
- तारीख – १५ ऑगस्ट २०२१
- ठिकाण – ज्युपिटर हॉस्पिटल, इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे (पश्चिम)
- वेळ – सकाळी १० वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत
गरजूंनी शिबिराचा लाभ कसा घ्यायचा?
- पूर्व नोंदणीनुसारच प्रवेश दिला जाईल.(Admission only with prior Appointment)
- सर्व लहान मुलांची एकाच दिवशी तपासणी शक्य नाही.
- त्यामुळे शिबिराच्या दिवसापासून (१५ ऑगस्टपासून) पुढील सलग १५ दिवस प्रत्येक रुग्णाला स्वतंत्र वेळ दिली जाईल.
- शिबिरात लहान मुलांची मोफत 2D इको तपासणी केली जाईल.
- प्राथमिक तपासणीनंतर हृदयाला छिद्र निदान झालेल्या लहान मुलांची महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आणि विविध ट्रस्ट अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाईल.
- यासाठी पालकांनी खाली नमूद केलेल्या वैद्यकीय सहाय्यकांकडे नोंदणी करावी.
कुठे कराल संपर्क आणि नाव नोंदणी?
- ज्युपिटर हॉस्पिटल, पिडियाट्रिक कॉरडीओलॉजिस्ट
संपर्क क्रमांक – ९०८२२५४५१७ - माऊली धुळगंडे, वैद्यकीय सहाय्यक,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
संपर्क क्रमांक – ८९०७७७६००२ - राम राऊत, वैद्यकीय सहाय्यक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
संपर्क क्रमांक – ८९०७७७६००४ - अरविंद मांडवकर, वैद्यकीय सहाय्यक, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
संपर्क क्रमांक – ८९०७७७६००६ - मंगेश चिवटे, कक्ष प्रमुख, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष
संपर्क क्रमांक – ८२७५९०३०३०/ ९८५१२३१५१५
कार्यालय क्रमांक – ०२२२५३२२५६७/२५
पत्ता – वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, ठाणे (पूर्व) - मुख्य कार्यालय – एकनाथ शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय, मंगला हायस्कूल शेजारी, ठाणे (पूर्व)
वेळ – सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत.
अधिक माहितीसाठी संपर्क करा
www.shivsenamedicalhelpline.org
कार्यालय संपर्क – (०२२-२५३२२५६७/२५)