Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईचा आमदारही सेक्सटोर्शनच्या जाळ्यात…बनावट अश्लील व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल!

September 6, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Shivsena MLA Honey Trap case

मुक्तपीठ टीम

सेक्सटॉर्शन किंवा हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शिवसेनेच्या एका आमदाराला राजस्थानमधील एका भामट्याने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवले आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री भरतपूरच्या सिकरी येथून या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात लक्ष्य ठरलेले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडारकर हे मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघातील आहेत.

 

नेमकं काय प्रकरण?

  • मुंबईचे कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडारकर यांना २० ऑक्टोबरच्या रात्री मेसेज आला.
  • हा मेसेज स्वतः मौसमदीनने केला होता.
  • गप्पांमध्ये आरोपीने स्वत:ला महिला सांगून आमदाराची मदत मागितली.
  • आमदार मंगेश यांनी महिलेला मदत करण्याचे मान्य केले.
  • काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला.
  • महिलेने सुमारे १५ सेकंद आमदारांशी बोलून मदतीची चर्चा केली.
  • व्हिडिओ कॉल कट होताच आरोपीने अश्लील व्हिडिओ पाठवला.
  • हा व्हिडिओ आमदाराचा व्हिडिओ होता, जो एडिट करण्यात आला होता.
  • असे पाठवून या आरोपीने ब्लॅकमेल करून आमदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली.
  • आमदार मंगेश यांनी फोन-पेवर गुंडाला ५ हजार रुपये पाठवले.

 

पुढेही पैशांची केली मागणी

  • दुसऱ्या दिवशी आमदार मंगेश यांना त्यांच्या फोनवर दुसऱ्या क्रमांकावरून फोन आला.
  • अश्लील व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करत आरोपीने पुन्हा ११ हजार रुपयांची मागणी केली.
  • त्यानंतर लगेचच आमदार मंगेश यांनी कुर्ला पोलिस ठाण्यात सेक्सटोर्शनसह ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला.

 

असा रचला सापळा

  • त्याच्या तक्रारीवरून, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मौसमदीनचा त्याच्या फोन-पे नंबरच्या आधारे शोध घेतला.
  • यादरम्यान पोलिसांनी त्याच्या लोकेशनवर लक्ष ठेवले.
  • जेव्हा पोलिस भरतपूरला पोहोचले, तेव्हा त्यांनी सिकरीपोलिस स्टेशनशी संपर्क साधला आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याची रणनीती आखली.
  • दिवसा त्या ठिकाणी पोहोचल्यास आरोपी पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याला माहिती मिळाली असावी, असा संशय पोलिसांना होता.
  • अशा स्थितीत हे पथक रात्री अकराच्या सुमारास सिकरी येथून टेस्की गावाकडे रवाना झाले.
  • रात्री पोलीस त्याच्या गावी पोहोचले तेव्हा तो मोबाईलवर चॅटिंग करत फिरत होता.
  • यादरम्यान पोलिसांनी त्याला पकडले.
  • लवकरच या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.

Tags: Mumbai crime BranchsextortionShivsena Mlaमुंबई गुन्हे शाखामुंबई पोलीसशिवसेनासेक्सटॉर्शन
Previous Post

ईडीची अशीही कारवाई! पेन्शनचा गैरवापर करणाऱ्या सेवानिवृत्त ईपीएफओ अधिकाऱ्याची मालमत्ता जप्त!

Next Post

सांगली जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचा झेंडा, मात्र बिनविरोध न केल्याचा काँग्रेसला फटका!

Next Post
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक

सांगली जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचा झेंडा, मात्र बिनविरोध न केल्याचा काँग्रेसला फटका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!