मुक्तपीठ टीम
सेक्सटॉर्शन किंवा हनी ट्रॅपच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. शिवसेनेच्या एका आमदाराला राजस्थानमधील एका भामट्याने सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवले आहे. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी मध्यरात्री भरतपूरच्या सिकरी येथून या आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणात लक्ष्य ठरलेले शिवसेनेचे आमदार मंगेश कुडारकर हे मुंबईतील कुर्ला विधानसभा मतदारसंघातील आहेत.
नेमकं काय प्रकरण?
- मुंबईचे कुर्ल्याचे आमदार मंगेश कुडारकर यांना २० ऑक्टोबरच्या रात्री मेसेज आला.
- हा मेसेज स्वतः मौसमदीनने केला होता.
- गप्पांमध्ये आरोपीने स्वत:ला महिला सांगून आमदाराची मदत मागितली.
- आमदार मंगेश यांनी महिलेला मदत करण्याचे मान्य केले.
- काही वेळाने आमदारांना एका महिलेचा व्हिडिओ कॉल आला.
- महिलेने सुमारे १५ सेकंद आमदारांशी बोलून मदतीची चर्चा केली.
- व्हिडिओ कॉल कट होताच आरोपीने अश्लील व्हिडिओ पाठवला.
- हा व्हिडिओ आमदाराचा व्हिडिओ होता, जो एडिट करण्यात आला होता.
- असे पाठवून या आरोपीने ब्लॅकमेल करून आमदाराकडे ५ हजार रुपयांची मागणी केली.
- आमदार मंगेश यांनी फोन-पेवर गुंडाला ५ हजार रुपये पाठवले.
पुढेही पैशांची केली मागणी
- दुसऱ्या दिवशी आमदार मंगेश यांना त्यांच्या फोनवर दुसऱ्या क्रमांकावरून फोन आला.
- अश्लील व्हिडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल करत आरोपीने पुन्हा ११ हजार रुपयांची मागणी केली.
- त्यानंतर लगेचच आमदार मंगेश यांनी कुर्ला पोलिस ठाण्यात सेक्सटोर्शनसह ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला.
असा रचला सापळा
- त्याच्या तक्रारीवरून, मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी मौसमदीनचा त्याच्या फोन-पे नंबरच्या आधारे शोध घेतला.
- यादरम्यान पोलिसांनी त्याच्या लोकेशनवर लक्ष ठेवले.
- जेव्हा पोलिस भरतपूरला पोहोचले, तेव्हा त्यांनी सिकरीपोलिस स्टेशनशी संपर्क साधला आणि त्या ठिकाणी पाठपुरावा करण्याची रणनीती आखली.
- दिवसा त्या ठिकाणी पोहोचल्यास आरोपी पळून जाण्याची शक्यता असल्याने त्याला माहिती मिळाली असावी, असा संशय पोलिसांना होता.
- अशा स्थितीत हे पथक रात्री अकराच्या सुमारास सिकरी येथून टेस्की गावाकडे रवाना झाले.
- रात्री पोलीस त्याच्या गावी पोहोचले तेव्हा तो मोबाईलवर चॅटिंग करत फिरत होता.
- यादरम्यान पोलिसांनी त्याला पकडले.
- लवकरच या आरोपीचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला दिला जाणार आहे.