मुक्तपीठ टीम
राज्यात सध्या राजकीय क्षेत्रात ठाकरे घराण्यातील तरुण नवे नेते मैदानात उतरले आहेत. सत्तांतरानंतर युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी शिवसंवाद यात्रा काढली आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे सध्या पक्षाला आणखी मजबूत करण्यासाठी राजकीय दौरा करत आहेत. राजकारणाच्या रिंगणात ठाकरे यांची तिसरी पिढी उतरल्याने आता कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
आदित्य ठाकरे यांनी शिव संवाद यात्रा
- आदित्य यांच्या शिवसंवाद यात्रेचा आज तिसरा दिवस आहे.
- आदित्य ठाकरे आज औरंगाबाद आणि अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधला.
- औरंगाबाद शहरात मुक्कामी असलेले आदित्य हे सकाळी साडेदहा वाजता शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली.
- आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद यात्रेला मोठ्याप्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
- याच यात्रेतून आदित्य हे बंडखोर आमदारांवर जोरदार हल्ला चढवत आहे.
- ठाकरे सरकारने आतापर्यंत सर्वाधिक निधी औरंगाबाद जिल्हाला दिला असतांना गद्दारी का केली? असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केला.
अमित ठाकरे यांची पक्षबांधणी!!
- महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे विद्यमान अध्यक्ष अमित ठाकरे सतत मनसैनिकांशी भेटत आहेत.
- पक्षाला नव्या जोमाने आणि ताकदीने उभे करण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे.
- ते सध्या मुंबई आणि आसपासच्या जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.
- मीरा रोड, वसई, विरार, पालघर या भागांना भेटी दिल्या.
- अमित ठाकरे आज अंबरनाथ, उल्हासनगर आणि बदलापूरला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत.
- त्यांनी मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकल ट्रेनमधून प्रवास केला.
- दादर ते अंबरनाथ या लोकल ट्रेनच्या प्रवासादरम्यान त्यांच्यासोबत मनसे कार्यकर्त्यांचाही मोठा जमाव होता.
- त्यांच्या उपस्थितीत अनेक विद्यार्थी नवनिर्माण विद्यार्थी सेनेत प्रवेश करत आहेत.