Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुधाच्या हमीभावासाठी राजू शेट्टींची केंद्रात धडक! समजून घ्या का आवश्यक आहे दुधाला हमीभाव…

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Raju Shetty And Milk

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून राज्यात दोन वेळा दूधाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री संजीव बलियान यांची या मुद्द्यावरून दिल्लीत भेट घेतली. जागतिक स्पर्धेत दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करण्याबाबत धोरण ठरवावं अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान दुधाला हमीभाव का आवश्यक आहे हे जाणून घेऊया.

दूध हमीभावाची गरज काय?

  • जनावरांचा चारा, पशुखाद्य आणि औषधे खूप महाग झाली आहेत, तर त्या तुलनेत दुधाच्या किंमतीत वाढ झालेली नाही.
  • अशा परिस्थितीत पशुपालन खूप महाग झाले आहे.
  • दुधाच्या दरात वाढ झाली तरच या जोड व्यवसायाची शेतीला जोड देता येणार आहे.
  • त्यामुळे गायीच्या दूधाला ४५ रुपये लिटर असा भाव मिळाला तरच या व्यवसायाचे गणित जुळणार आहे.
  • सध्या गायीच्या दुधाला केवळ ३० ते ३२ रुपये लिटर दर मिळत आहे.

चारा किती महाग?

  • दरवर्षी नव्हे तर सहा महिन्यातून एकादा कडब्याचे दर वाढत आहेत.
  • गतवर्षी ६ ते ७ रुपयांना मिळणारी कडब्याची पेंडी यंदा १० रुपयांपर्यंत गेली आहे.
  • अधिकचे उत्पादन मिळावे म्हणून कळणा, पेंड, सरकी यासारखे पशूखाद्य गरजेचे आहे.
  • २० रुपये किलो असणारे हे पशूखाद्य आता ३८ रुपये किलोंवर गेले आहे.
  • २०१६-१७ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून एका जनावरामागे शेतकऱ्यांना रोजचे ७ ते ५० रुपये मिळतात.
  • शिवाय जनावरे दुभती असली तर अन्यथा त्यांच्या सांभाळण्याचाही खर्च यातून निघत नाही.

दुधाला किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणून दर निश्चित करावे….

  • जनावरांच्या संगोपनावर होणारा खर्च पाहता जर डेअरी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधाच्या दरात वाढ केली नाही, तर मग लोक हे काम का करतील?
  • खर्चानुसार सरकारने दुधाला किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणून दर निश्चित करावी.
  • खर्चावर ५०% नफा घेऊन किमान किंमत निश्चित करावी.
  • अन्यथा अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देणाऱ्या या दुग्धव्यवसाय क्षेत्राची स्थिती बिघडेल असे भारत डिघोळे यांनी सांगितले आहे.

Tags: MaharashtramilkRaju shettiदूधाला हमीभावमहाराष्ट्रराजू शेट्टी
Previous Post

महाराष्ट्रात पुन्हा सीबीआय! आघाडीला भाजपाचं नवं टेन्शन! पण पोलिसांवर विश्वास नाही की सत्तेची भीती?

Next Post

नवे ठाकरे मैदानात! शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे, मनसेसाठी अमित ठाकरे!!

Next Post
Thackeray

नवे ठाकरे मैदानात! शिवसेनेसाठी आदित्य ठाकरे, मनसेसाठी अमित ठाकरे!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!